अस्वच्छतेमुळे विविध प्रकारचे आजार बळावतात ते होऊ नये गावात स्वच्छता राहावी यासाठी ग्रामीण स्वच्छता मिशन अंतर्गत गावागावात ग्राम पंचायतीच्या मार्फतीने शौचालय बांधण्यात आले. असेच शौचालय पंचायत समिती मूल अंतर्गत ग्राम पंचायत टेकाडी येथे बांधण्यात आले. माञ त्या शौचालयाच वापर केला जात नसुन लोक रस्त्यावरच शौचास बसत असल्याने रस्त्यावर घाण पसरली आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाताना नाक दाबुन जावे लागत आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षीपणामुळे स्वच्छतेचा बोजवारा वाजला आहे. हागणदारी मुक्त तालुका म्हणून मिरविणाऱ्या पंचायत समिती मूल च्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
देशापासून तर ग्रामीण भागात पर्यंत स्वच्छता मिशन अभियान राबवून गावात स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र याला पंचायत समिती मूल अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत टेकाडी गाव कोसोदूर असल्याचे दिसून येत आहे. गावात लाखो रुपये खर्च करून वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले. त्यामुळे त्या शौचालयाचा वापर करण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक होते. तसेच बाहेर शौचास गेल्यास दंडाची रक्कम आकारली जाईल अशी ताकीद देणे आवश्यक असताना मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे भर ये जा करणाऱ्या रस्त्यावर शौचास बसुन संपूर्ण रस्त्यावर घाण केली जात आहे. त्यामुळे ये जा करणाऱ्यांना नाक दाबुन रस्ता पार करावा लागत आहे. त्यामुळे पंचायत समिती मूल ने तालुका हागणदारी मुक्त असल्याचे जाहीर केले होते. त्याचा बोजवारा वाजल्याचे चित्र दिसत आहे. याकडे जिल्हा परिषद चंद्रपूर ने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
