माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्याने नंदू भाऊ रणदिवे मित्र परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांना नोटबुक चे वाटप




रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात विकासाची गंगा आणणारे विकासपुरुष माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्याने नंदू भाऊ रणदिवे मित्र परिवाराच्या वतीने सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल च्या नर्सरी ते इयत्ता 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना नोटबुक चे वाटप करण्याचा कार्यक्रम भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, माजी जिल्हा परिषद चंद्रपूरच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांच्या अध्यक्षतेखाली  पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषद मूल चे माजी उपाध्यक्ष नंदूभाऊ रणदिवे, सुभाष शाळा समितीचे अध्यक्ष नरसिंग गणवेनवार, शाळा सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश नंदाराम , शाळेचे सचिव तथा मुख्याध्यापक अविनाश जगताप,
नंदू भाऊ रणदिवे मित्र परिवाराचे सदस्य राकेश ठाकरे, प्रशांत बोबाटे, बबन गुंडावार, संजय येरोजवार, महेंद्र करकाडे, अनिल साखरकर, संजय मारकवार, लोकनाथ नर्मलवार, सूरज मांदाडे, रुपेश निकोडे यांचेसह शेकडो मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते.