विकासाची सतत कास घेऊन मूल तालुक्याबरोबरच शहराचा देखील चेहरा मोहरा बदलविणाऱ्या विकास पुरुष म्हणून संबोधले जाणारे व्यक्तिमत्व माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्या प्रसारण मंडळ मूल द्वारा संचलित सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे गरीब १४२ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, दोन गरीब विद्यार्थ्यांना स्टडी टेबल व सर्व विद्यार्थ्यांना मसाले भाताचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या थाटात करण्यात आले. शाळेचे अध्यक्ष नरसिंग गणवेनवार यांच्या अध्यक्षतेखील आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळा सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश नंदाराम, रुपेश पाटील मारकवार, प्रा.चंद्रकांत मणियार, गीताचार्य गणेश मांडवकर, सुखदेव चौथाले,
नगर परिषद मूलचे माजी सभापती महेंद्र करकाडे, प्रसिद्ध उद्योजक निलेश रायकटीवार, प्रा. संजय येरोजवार , माजी नगराधक्ष उषाताई शेंडे, माजी सैनिक मारोती कोकाटे, शाळेचे सचिव तथा मुख्याध्यापक अविनाश जगताप, समितीच्या पदाधिकारी सुवर्णा पिपरे, इंदुताई मडावी तसेच सर्व समित्यांचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी यावेळी शाळेचे सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच शाळेचा चेहरा मोहरा बदलविणाऱ्या शाळेचे अध्यक्ष नरसिंग गणवेनवार यांचा कार्याचा गौरव केला. पैसे सर्वांकडे असते मात्र तो दीन, दुबळे,गरजू व गरीब विद्यार्थ्यांना काही प्रमाणात खर्च करण्याची मनातील भाव सर्वांमध्ये नसतो. तो भाव नरसिंगभाऊ गणवेनवार यांचेकडे असल्याचा आवर्जून उल्लेख आपल्या प्रास्ताविक भाषणात शाळेचे सचिव तथा मुख्याध्यापक अविनाश जगताप यांनी करीत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी १४२गरीब विद्यार्थ्यांना नरसिंग गणवेनवार रुपेश पाटील मारकवार, प्रकाश नंदाराम यांचेकडून गणवेश वितरण करण्यात आले. प्रसिद्ध उद्योजक निलेश रायकटीवार यांचेकडून दोन गरीब विद्यार्थ्यांना दोन स्टडी टेबल मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. या सुधारभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्याने आयोजित कार्यक्रमाला बहुसंख्येने पालक उपस्थित होते.
