आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस मुल शहरात सेवा दिवस म्हणून होणार साजरा !



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
  
 बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे विकासाचे महामेरू,विधानसभेतील बुलंद आवाज माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार 
यांचा वाढदिवस उद्या दिनांक 30  जुलै  2025 रोज बुधवार ला मूल  शहरात सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. मूल शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सेवाभावी कार्यक्रमाची रेलचेल या निमित्याने राहणार असुन भाजप युवा मोर्चा व महिला मोर्चा तसेच भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग होणार आहेत. यात सकाळी 5.30 वाजता महिलांची 
  मॅरेथॉन स्पर्धा,(गांधी चौक ते शासकीय रुग्णालय रस्ता),
सकाळी10 वाजता उपजिल्हा रुग्णालय मूलयेथे रुग्णांना फळे वाटप, सकाळी 11 वाजता भाजपा कार्यालय मूल येथे 
 रक्तदान शिबिर , दुपारी 1.00 वाजता गरजूंनाआधार काठ्याचे वाटप , दुपारी 2 .00 वाजता 
मुलांना खाऊ व बुक वाटप , दुपारी 3.00 वाजता गांधी चौक मूल येथे मसाला भात व बुंदा वाटप , दुपारी 4.00 वाजता विकासाची मशाल रॅली भाजपा कार्यालय ते माता कन्यका मंदिर पर्यंत काढण्यात येणार आहे. सायंकाळी 6.00वाजता महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. रात्री 8.00 वाजता बुद्ध विहार मूल येथे फळे वाटप केले जाणार आहे . या सर्व कार्यक्रमाला भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी व सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे वर प्रेम करणाऱ्या जनतेनी उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पक्ष मूल शहर च्या वतीने करण्यात आले आहे.