महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस मूल येथील युवाक्रांती बहुउद्देशिय संस्थेने पुढाकार घेत व नगर परिषद मूल चे माजी उपाध्यक्ष अनिल संतोषवर यांच्या मार्गदर्शनात रक्तदान शिबीर आणि विविध उपक्रम राबवुन साजरी करण्यात आली.
मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात रक्तदान शिबीर घेण्यात आले. याशिबीराचे उद्घाटन मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष अनिल संतोषवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. देवेंद्र लाडे, बजरंग दलाचे माजी जिल्हाध्यक्ष विपीन भालेराव, युवाक्रांती बहुउद्देशिय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निखील वाढई, अध्यक्ष प्रणित पाल, कार्याध्यक्ष निहाल गेडाम आदी उपस्थित होते. यावेळी 57 रक्तदात्यांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले . तसेच याच कार्यक्रमाचे औचित्य साधून
उपजिल्हा रूग्णालयात फळवाटप, गरजु नागरीकांना ब्लॅकेंटचे वाटप, शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक आणि महापुरूषांच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठीसोनू बट्टे, हर्षल दुपारे,सौरभ वाढई, वैष्णव पोलचलवार,साई क्रिष्णा बोर्लीवार, सुजित खोब्रागडे, साजित सय्यद, पिंटु चिमुलवार, सोनल आगबनवार, अमित चलाख, आदर्श गेडाम, इश्वर लोनबले,साई आक्केवार, किशोर चौखुंडे, सचिन चौखुंडे, , तेजस महाडोळे, सुमित दुपारे आदीं युवा क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
