किरण पोरेड्डीवार यांच्या वाढदिवसानिमित्य विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप




रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

मूल तालुक्यातील डोंगरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्राम पंचायत सदस्य किरणभाऊ पोरेड्डीवार   यांच्या वाढदिवसा निमित्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जोपासत मौजा डोंगरगाव व रत्नापूर  येथिल जिल्हा परिषद शाळेतील  २५० विद्यार्थ्यांना     स्कूलबॅगचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचायत समिती मूलचे गटविकास अधिकारी अरुण चनफने, 
 पिटीओ पुठ्ठावार साहेब, ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी राठोडसाहेब, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोंगरगावचे डॉ . गोकुल कामडी, व्यवस्थापन समिती अध्यक्ष  उपाध्यक्ष,सदस्य व जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक  शिक्षिका आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रथमच स्कूल बॅग मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद झाल्याचे दिसुन येत होते.