पक्ष बांधणीसाठी लक्ष केंद्रित करणार - अविनाश जगताप यांचा निर्णय !
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात आपला ठसा उमटविणारे भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अविनाश जगताप यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.भाजपाच्या मूल येथील कार्यालयात भाजपचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष चंदू मारगोनवार व शहर अध्यक्ष प्रविण मोहूले यांच्या पुढाकाराने वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा देत अविनाश जगताप यांना पुढील काळात चांगले कार्य घडावे यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी मूल तालुका व शहरातील भाजपाचे नेते, युवा कार्यकर्ते, महिला भाजपा आघाडीच्या प्रमुख नेत्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
विद्या प्रसारण मंडळ मूल द्वारा संचलित सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व शिक्षकांनी पुढाकार घेत आयोजित कार्यक्रमात संस्थेचे सचिव तथा शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून भरविण्यात आले. व सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक, राजकीय व शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.
पक्ष बांधणीसाठी लक्ष केंद्रित करणार - अविनाश जगताप
भाजपा हा पक्ष सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचावा. त्यांच्या विविध समस्या सुटाव्यात यासाठी पक्ष बांधणी करणे आवश्यक आहे. यासाठी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी तालुकाध्यक्ष संध्याताई गुरनुले, माजी शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर,नवनिर्वाचित भाजपचे तालुकाध्यक्ष चंदूभाऊ मारगोनवार, शहर अध्यक्ष प्रविण मोहूर्ले यांच्या नेतृत्वाखाली आपण भाजपा पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करणार आहे. माजी तालुकाध्यक्ष पदावर असताना ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची वेळोवेळी भेट घेत पक्ष संघटन मजबूत केले होते. आजही त्यांच्याशी संपर्क आहे.कार्यकर्त्याची फळी निर्माण करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असुन माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी माझ्या सारख्या लहान कार्यकर्त्यावर जो विश्वास दाखविला आहे. तो पूर्णत्वास नेत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत राहणार आहे.
