ग्रामपंचायत चिरोली ला पाच वर्षात मिळाले होते १ कोटी ८२ लाख रुपये !
पंचायत सामीती मूल अंतर्गत येणाऱ्या चिरोली ग्राम पंचायतीला सन २०२० ते सन २०२५ पर्यंत गावातील विविध विकास कामे करण्यासाठी १ कोटी ८२ लाख १० हजार ७५३ रुपये शासनाकडून प्राप्त झाले. या निधीतून कामे करण्यात आली मात्र कामाचा दर्जा निकृष्ठ स्वरूपाचा असुन लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.त्यामुळे चिरोली येथील भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते वसंत सादुलवार यांनी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार व जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेकडे चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद चंद्रपूरचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी (ग्राम पंचायत) यांनी १६/०६/२०२५ ला गट विकास अधिकारी पंचायत समिती मूल यांना पत्र पाठवून चौकशीचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ग्राम विकास अधिकारी, ग्राम पंचायत पदाधिकारी व कंत्राटदार चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शासन गावांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी थेट ग्राम पंचायतीच्या बँक खात्यात विकास निधी जमा करीत आहे. ग्राम पंचायत कमिटीचे सदस्य व ग्रामसेवक यांच्या देखरेखीखाली गावचा विकास होईल हाच उद्देश समोर ठेवण्यात आला आहे. मात्र ग्राम पंचायत चिरोली याला अपवाद आहे. सन २०२० ते २०२५ पर्यंत शासनाकडून विविध विकास कामांसाठी १ कोटी ८२ लाख १० हजार ७५३ रुपये प्राप्त झाले. यात कंत्राटदारांना हाताशी घेऊन ग्रामविकास अधिकारी विजय यारेवार यांनी स्वर्जीने कामे केल्याची चर्चा सुरू झाली आहे.लोकांच्या हिताच्या दृष्टीने एकही चांगले काम केले नसल्याची प्रतिक्रिया आहे.गावाच्या विकासासाठी आलेला निधी काही मोजक्या ग्राम पंचायत सदस्यांना विश्वासात घेत हा १ कोटी ८२ लाख रुपयांचा खेळ मांडला गेल्याचे दिसुन येत आहे. त्या अनुषंगाने केलेल्या तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषद चंद्रपूरचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी (ग्राम पंचायत) यांनी पत्र क्रमांक ८२०/२०२५ दिनांक १६/०६/२०२५ अन्वये गट विकास अधिकारी पंचायत समिती मूल यांना पत्र पाठवुन चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे.त्यामुळे चौकशीच्या फेऱ्यात ग्राम विकास अधिकारी, ग्राम पंचायत पदाधिकारी व कंत्राटदार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वसंत सादुलवार सामाजिक कार्यकर्ते चिरोली:-
ग्राम पंचायत चिरोलीला गाव विकासासाठी १ कोटी ८२ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. मात्र या निधीतून बांधण्यात आलेले कामे निकृष्ठ दर्जाचे झाले आहेत. मी स्वतः कामाकडे फेरफटका मारल्यानंतर दिसुन आले आहे. त्यामुळे भाजपाचा एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून मी आमदार सुधीर मुनगंटीवार व
जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे लेखी तक्रार केली. त्या अनुषंगाने
जिल्हा परिषद चंद्रपूरचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी (ग्राम पंचायत) यांचे पत्र मिळाले आहे.
कामाची चौकशी झाल्यास अनेक गैरव्यवहार उघड झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. सुधीरभाऊ कडे देखील सातत्याने पाठपुरावा करणार आहे.
