सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जनकल्याण सामाजिक संस्था मूल च्या वतीने
आषाढी एकादशीच्या पावन पर्वाव पंचायत समिती मूल च्या सभागृहात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूल नगरीतील जेष्ठ पत्रकार प्रा. चंद्रकांत मनियार होते तर उद्घाटक म्हणून नगर परिषद मूलचे माजी बांधकाम समिती सभापती प्रशांत समर्थ होते तर
प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार तथा जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष दीपक देशपांडे, पत्रकार युवराज चावरे, पत्रकार प्रमोद मशाखेत्री, देवनिल विद्यालय टेकाडी चे मुख्याध्यापक राजेश सावरकर, तसेच पत्रकार तथा जनकल्याण सामाजिक संस्था मूल चे अध्यक्ष राजू गेडाम आदी विचार मंचावर विराजमान होते.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष राजू गेडाम करीत संस्थेच्या कार्याची व विविध उपक्रमांची माहिती दिली.
याप्रसंगी मुख्याध्यापक राजेश सावरकर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा शहरी विद्यार्थ्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज असल्याचे यावर्षीच्या निकालाने स्पष्ट केल्याचे प्रतिपादन केले आणि आता शिक्षण बोर्डाने चॅलेंज पद्धत सुरू केल्याने हे चॅलेंज देणं आणि ते पूर्ण करीत यशस्वी होण्यात ही ग्रामीण विद्यार्थी अग्रेसर ठरत असल्याचे स्पष्ट करीत आता करिअरची निवड करतानाही तो स्पर्धेत पुढेच असायला हवे असे मत व्यक्त केले.
दीपक देशपांडे यांनी आपल्या वक्तव्यातून शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी कमी सोयीसुविधा उपलब्ध असतांना गुणवत्तेच्या बाबतीत कुठेही मागे नसून एक पाऊल पुढे असताना केवळ योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्यांना मागे खेचल्या जात आहे त्यामुळे त्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षस्थानावरून बोलतांना प्रा.चंद्रकांत मनियार शिक्षण क्षेत्रातील कार्याचा आढावा घेत जेव्हा आम्हाला आमचा विद्यार्थी विद्यार्थीनी त्यांच्या आयुष्यातील यशस्वीता भेटित स्पष्ट करते आणि ओळख दाखवते त्या क्षणी होणारा परमानंद हा फार महत्वाचा व मौल्यवान असतो असे प्रतिपादन करीत स्पर्धेच्या युगात आपण जिद्द चिकाटी व संयम बाळगून यशस्वी होण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी जनकल्याण सामाजिक संस्था मूल चे वतीने आयोजित निबंध स्पर्धेतील विजेते आणि दहावी बारावीचे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवर यांचे हस्ते प्रमाणपत्र,व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमापूर्वी बुद्ध टेकडी परिसरात येथे भंते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे सदस्य अमोल दुधे, आशिष आकनूरवार, रवि वाळके, बंडू अल्लीवर, गुरुदास थेरकर, ,शशिकांत गणवीर, अमोल वाळके यांचेसह परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
