बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार तथा माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्याने सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूलच्या वतीने दिनांक 30 जुलै 2025 रोज बुधवारला सकाळी 9.30 वाजता शाळेतील 142 गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष नरसिंगभाऊ गणवेलवार हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे मार्गदर्शक सदस्य रूपेश पाटील मारकवार , शाळा सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश भाऊ नंदाराम, व्यावसायिक निलेश रायंकटीवार शाळेचे सचिव तथा मुख्याध्यापक अविनाश जगताप व शाळांतर्गत असलेल्या सर्व समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थितीत गणवेश व निलेश रायकटीवार यांचे कडून दोन गरीब स्टडी टेबल वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सोबतच विद्यार्थ्यांना मसालेभात वाटप करण्यात येणार आहे. तरी शाळेच्या सर्व समित्यांचे पदाधिकारी, सदस्य व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक अविनाश जगताप यांनी केले आहे.
