लेकरामधील गुण शोधता आले पाहिजे - गणेश शिंदे

विद्यार्थ्यांनी प्रत्येक मिनिटाचा सदउपयोग करावा - आमदार सुधीर मुनगंटीवार 
 


मूल येथे पार पडला गुणवंत विद्यार्थी सत्कार व करियर मार्गदर्शन कार्यक्रम 



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
 
पालकांना आपल्या लेकराकडून जास्त अपेक्षा न करता त्याच्यातील टॅलेंट बघुन त्या क्षेत्राकडे जाण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. आपल्या लेकरातील  गुण शोधता आले तर त्याला निश्चित  ध्येय गाठता येईल असा विश्वास पुणे येथील थोर विचारवंत गणेश शिंदे यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्ष मूल शहर व तालुका शिक्षक आघाडीच्या वतीने कन्नमवार सभागृह 
मूल येथे आयोजित गुणवंत विदयार्थी अभिनंदन सोहळा आणि विदयार्थी करियर व व्यक्तीमत्व विकास मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा  आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी बल्लारपूर नगर परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष हरीश शर्मा होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार मुनगंटीवार यांनी 
 मूलच्या विदयार्थ्यांनी देशात आपले नाव मोठे करावे.देशाचा राष्टपती मूलचा व्हावा,देशात सांयटिस्ट व्हावा,आर्मी चिफ व्हावा अशी अपेक्षा करीत प्रत्येक मिनिटाचा सदुउपयोग करण्याचे आवाहन केले.यावेळी दहावी,बारावी तील गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनूले, भाजपाचे नेते डॉ.मंगेश गुलवाडे, किरणताई बूटले 
भाजपाचे युवा नेते प्रभाकर भोयर,शहर अध्यक्ष प्रविण मोहूर्ले, नगर परिषद मुलचे माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे, भाजपाचे माजी तालुका अविनाश जगताप 
आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयुक्त संचालन बंडू अल्लीवर व रीना मसराम यांनी केले.प्रस्ताविक सुखदेव चौथाले तर उपस्थतांचे आभार युवराज चावरे यांनी मानले. या कार्यक्रमाला भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,भाजपा शिक्षक आघाडीचे पदाधिकारी , गुणवंत विदयार्थी ,विदयार्थीनी,पालक वर्ग,शिक्षक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.