आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मूल येथे विद्यार्थी करिअर व व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन तथा गुणवंत विद्यार्थी अभिनंदन सोहळा



ख्यातनाम वक्ते, प्रखर विचारवंत प्रा.गणेश दादा शिंदे पुणे करणार मार्गदर्शन




रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

 दहावी व बारावीचे निकाल विद्यार्थ्यांना मिळाले. अनेक विद्यार्थी प्रचंड मेहनत करून शिक्षण घेत आहेत मात्र मार्गदर्शनाच्या अभावी विद्यार्थ्यांना भविष्यात कोणते क्षेत्र निवडायचे  याची माहिती नसते तसेच या वयात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी सखोल मतगदर्शनाची गरज असते, हा उदात्त हेतू लक्षात घेत महाराष्ट्र राज्याचे  माजी वने, सांस्कृतिक व मत्स्यपालन मंत्री, व बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रेरणेतून दिनांक २९ जून २०२५ ला सकाळी १२.०० वाजता मूल येथील स्व. मा. सां.कन्नमवार सभागृहात विद्यार्थ्यांसाठी करिअर व व्यक्तिमत्त्व विकास मार्गदर्शन आणि मुल शहर व तालुक्यातील 10 वी व 12 वी च्या प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांची सदर कार्यक्रमात उदघाटक म्हणून उपस्थिती राहणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूर *जिल्हा अध्यक्ष हरीशजी शर्मा* राहतील.  प्रमुख पाहुणे म्हणून *माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व भाजपा जिल्हा महामंत्री श्रीमती संध्याताई गुरनुले, जिल्हा महासचिव डॉ. मंगेश गुलवाडे*, मुल शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, माजी नगराध्यक्ष प्रा.सौ.रत्नमाला भोयर, माजी नगराध्यक्ष सौ.उषा शेंडे, माजी पंचायत समिती सभापती चंदू मारगोनवार, पूजा डोहणे, मुल शहर महासचिव अजय गोगुलवार, चंद्रकांत आस्टनकर,अविनाश जगताप,मोतीलाल टहलियानी प्रविण मोहूर्ले तसेच सेवानिवृत्त प्राचार्य,मुख्याध्यापक यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले *ख्यातनाम वक्ते,प्रखर विचारवंत, मान.गणेशदादा शिंदे पुणे* यांचे विद्यार्थ्यांसाठी करियर तसेच  व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन लाभनार असून, ही विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. गणेशदादा शिंदे हे प्रसिद्ध वक्ते असून यु ट्युब वर त्यांची अनेक मार्गदर्शनपर भाषणे उपलब्ध आहेत. सर्व विद्यार्थी व पालकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी मुल शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.