सखोल चौकशी करत आरोपींना कठोर शिक्षा करा, पीडितांना न्याय द्या


नोकरी घोटाळा- म्हाडा घोटाळा चा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवा



भारतीय जनता पक्षाची पीडितांसंमवेत मागणी

रवि वाळके /दे दणका न्यूज 
मुल शहरातील संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या नोकरी लावून देतो म्हणत अनेक गरीब लोकांच्या कष्टाचा पैसा घेऊन फसवणूक करणाऱ्या आरोपींची सखोल चौकशी करा अशी मागणी भारतीय जनता पक्ष मुल च्या वतीने एका शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना प्रभारी ठाणेदार वंजारी यांच्यामार्फत केली आहे,
त्याचप्रमाणे या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात यावा अशी मागणी सदर शिष्टमंडळाने माजी मंत्री व स्थानिक आमदार सुधीर मुनगंटीवार यांचेकडे केली आहे,
  या प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत आहे , फक्त काहीच लोक तक्रार नोंदवायला समोर आले आहेत पण प्रत्यक्षात अनेक लोकांनी आपल्या कष्टाचा पैसा आपल्याला किंवा आपल्या पाल्याला नोकरी लागेल या भोळ्या आशेपोटी या महाभागांना दिला आहे, नाना आक्केवार व राजू पुद्दटवार हे मुख्य आरोपी म्हणून समोर आले आहेत पण या घोटाळ्याची व्याप्ती करोडोच्या घरात असून याची व्याप्ती अजून मोठी असण्याची शक्यता आहे, अनेकांनी नातेवाईक मित्रा मंडळी कडून उधार घेत , शेती घर दार विकून या महाठगांना पैसे दिलेत, या प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी हे संपूर्ण प्रकरण हे गुन्हे अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या शिस्तमंडळाने एका पत्रकान्वये आमदार सुधीर मुनगंटीवार यांचेकडे केली आहे, शिष्टमंडळात प्रवीण मोहूर्ले, मिलिंद खोब्रागडे, श्रीमती मनीषा गांडलेवार,जितेंद्र टिनगुसले,संतोष गाजुलवार, हर्ष गांडलेवार व पीडित कुटुंब सदस्यांची उपस्थिती होती