पोभुर्णा तालुक्यातील थेरगाव अंधारी नदीतून भरमार रेतीचा उपसा केला जात असून पोकलँडने भर नदीच्या पाण्यातून रेती काढली जात आहे. त्यामुळे नदी पात्रात मोठ मोठे खड्डे पडले असून भविष्यात पर्यावरणा सोबतच जनावरांना देखील धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाजवी पेक्षा जास्त दिवस रात्र उपसा केल्याने नदी पात्रातील सर्व खोदून रेती नेली जात असताना मात्र पोभुर्णा येथील महसूल प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप केला जात आहे याकडे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी घालुन चौकशी केल्यास सत्य समोर येण्याची शक्यता आहे.
पर्यावरणाचा समतोल आबाधित राहण्यासाठी रेतीचा उपसा करण्यासाठी महसूल विभागाने काही नियम लागू केले असून पोकलँडने रेतीचा उपसा करू नये अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.सूर्यास्तानंतर रेतीचा उपसा करू नये असा नियम असतान भरमार दिवस रात्र रेतीचा उपसा पोभुर्णा तालुक्यातील थेरगाव येथील अंधारी नदीतील रेती घाटावर उपसा केली जात आहे. ती रेती एका शेतात डंपिंग करून साठविली जात असून रात्री खाजगी रित्या बेभावात विकली जात आहे.कंत्राटदार पैसे कमविण्याचा नादात सर्व नियमाला बगल देत रेतीचा उपसा केला जात आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.गरिबाच्या घरकुलाला रेती व शासकीय कामात रेती उपलब्ध करून द्यायचे असताना खाजगी रित्या बेभाव विक्री करून आपले पोट भरण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोभुर्णा महसूल विभागाने त्वरित लक्ष घालुन कारवाई करावी जेणेकरून शासनाच्या तिजोरीत जमा होणारा महसूल कंत्राटदाराच्या पोटात जाणार नाही. तालुका प्रशासन कुंभकर्णी झोपेत असेल तर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी लक्ष घालण्याची मागणी परिसरातील जनतेनी केली आहे
