आमदार सुधीर मुनगंटीवार दाबगाव मक्ता येथील तलावाची पाळीच्या कामाकडे घालणार लक्ष!



जलसंधारण विभाग मूलचे दुर्लक्ष!



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 


मूल तालुक्यातील दाबगाव तुकूम येथील मागील आलेल्या पावसाळ्यात मामा तलाव  फुटल्याने परिसरातील शेकडो शेतकरी बाधित झाले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पिकांपासून वंचित व्हावे लागले होते. येत्या पावसाळ्यात तरी शेतकऱ्यांना पिकांपासून वंचित होऊ नये यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत असलेल्या उपविभागीय अधिकारी जलसंधारण उपविभाग मूल येथे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने ही बाब माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचेकडे शेतकऱ्याच्या हितासाठी मोबाईल वरून बोलण्यात आले. तेव्हा उद्या अधिकाऱ्याची बैठक आयोजित केली असून यात हा प्रश्न अग्रक्रमाने सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याचे दे दणका न्यूजचे संपादक रवि वाळके यांना सांगितले. त्यामुळे 
या वर्षाच्या हंगामात शेकडो शेतकरी पिकांपासून वंचित राहण्याची चिंता कमी झाली आहे.

  मूल तालुक्यातील दाबगाव मक्ता या गावातील 
 मामा तलाव दाबगाव तुकुम म्हणून ओळखला जात असुन सर्वे नंबर  ७२ असलेल्या या तलावाजवळ शेकडो शेतकऱ्यांच्या शेत जमिनी आहेत.शेतीच्या पिकासाठी हा वरदान असणारा हा तलाव असुन या तलावाच्या दुरुस्तीकडे जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने सातत्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे या तलावाची पाळ कमकुवत होत गेली. मागील जुलै ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस सतत पडत असल्याने तलाव तुडूंब भरला.तलावाच्या दुरूस्ती अभावी तलावाची पाळ कमकुवत झाल्याने तलावातील पाणी रोखण्यास असमर्थ झाली. त्यामुळे संपुर्ण पाण्याचा लोंढा तलावाच्या पाळीवरून वाहायला लागले. याचा परिमाण असा Birthday झाला की,परिसरात असलेल्या शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले. त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले. त्याच बरोबर शेतात रेतीचे ढग देखील जमा झाले. त्यामुळे शेतकरी पिकांपासून वंचित होत असल्याने तहसीलदार मूल यांचेकडे याबाबतची आपबिती सांगितली. तालुका प्रशासनाने पंचनामा केला मात्र तुटपुंजी मदत काही महिन्यांनी करून बोळवण घातली. त्यावेळी शेतकऱ्यांनी शेतातील रेती उचलण्याची मागणी करीत  पडलेले खड्डे सुव्यवस्थित करून तलावाची पाळ बुजविण्याची मागणी केली.मात्र बरेच महिने लोटत असताना देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पुढील हंगाम मे जून महिन्यात सुरू होणार असल्याने येत्या महिन्यात तलावाची दुरूस्ती करीत तलावाची पाळ बुजविणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाचे पाणी तलावात जमा होणार नाही पर्यायाने शेतकऱ्याच्या हातात पिक येणार नाही. पंचायत समिती मूल चे गट विकास अधिकारी मुक्त व जलसंधारण अधिकारी मूल यांना निवेदन देऊन मागणी केली असुन सतत पाठपुरावा सुरू आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. ही बाब दे दणका न्यूज मूल चे संपादक रवि वाळके यांचेकडे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यावेळी भाऊशी मोबाईल वरून संवाद साधण्यात असल्यावर सोडविण्याचे आश्वासन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. त्यामुळे शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.



सुधीर मुनगंटीवार माजी मंत्री तथा आमदार बल्लारपूर विधानसभा :- 

मूल तालुक्यातील  दाबगाव मक्ता येथील मामा तलावाची पाळ दुरुस्त होणे आवश्यक आहे. अन्यथा अनेक शेतकरी पिकापासून वंचित राहणार. त्यामुळे उद्या अधिकाऱ्याची बैठव चंद्रपूर येथे बोलाविण्यात आली आहे. या गंभीर प्रकार असून शेतकऱ्याच्या हितासाठी उद्या तत्काळ निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावणार आहे.