जंगली डुकरांनी घातला चिरोली गावात धुमाकूळ, तीन महिला गंभीर जखमी

        



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

मूल तालुक्यातील चिरोली येथे सकाळी ८ वाजता दरम्यान जंगली डुकराने  गावामध्ये धुमाकुळ घातल्याने यात तीन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. यात  शिवण्या प्रेमदास केस्तावार( ९) सीताबाई देवजी येरमलवार, (६०) बेबी बाई कुंभारे,(६५) यांचा समावेश आहे. गंभीर जखमी झाले याबाबत माहीती होताच वनविभागाचे
 क्षेत्र सहाय्यक प्रशांत खनके, वनरक्षक एस जी. गेडाम  वनरक्षक येसांबरे,वनरक्षक ठाकूर , पर्यावरण मित्र उमेशसिंह झीरे यांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालयात भरती केले आहे. 
गंभीर असलेल्या महिलेला
चंद्रपूर येथे पुढील उपचार करण्यासाठी पाठविण्यात आले आले आहे.वन्यप्राण्यांचा संचार वाढला असुन कोणता प्राणी गावात येईल याची श्वास्वती राहिली नाही. त्यामुळे वनविभाग एक्शन मोड वर असणे गरजेचे झाले आहे.