सिंदेवाही बसस्थानातील पंखे बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय, पंखे सुरू करण्याची मागणी



रवि वाळके/दे दणका न्यूज 

मूल नागभीड या मार्गावर असलेले महत्वाचे असलेले सिंदेवाही येथील बसस्थानक भव्य दिव्य असले असुन शेकडो प्रवासी या बसस्थानकात ये_जा करीत असतात.उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांना पंख्याची सोय असणे आवश्यक आहे. मात्र ते बंद असल्याने शेकडो प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे. दरदिवशी लाखो रुपयांचे उत्पन्न कमावणारे महाराष्ट्र परिवहन महामंडळ साधे पंखे सुरू करण्यास तयार नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे . राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते तथा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या निर्वाचन क्षेत्रात जनतेची गैरसोय व्हावी याबाबत नाराजीचा सूर उमटत आहे. याकडे त्वरीत लक्ष घालुन बसस्थानकातील पंखे सुरू करण्यात यावे अशी मागणी जनतेनी केली आहे