विरई शेत शिवारात विद्युत तारेच्या स्पर्शाने पाच म्हशी ठार!




रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

मूल तालुक्यातील विरई येथील एका शेतशिवारात चराईसाठी गेलेल्या पाच म्हशी तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन जागीच मृत्युमुखी पडल्या. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.मृत्युमुखी पडलेल्या म्हशींपैकी चार म्हशी शंकर मोहुर्ले यांच्याआहेत, तर एक म्हैस मुरली सोनुले यांची आहे. ही घटना घडताच स्थानिकांनी महावितरणला तातडीने माहिती दिली, मात्र अनेक तास उलटून गेले तरीही प्रशासनाच्या वतीने कोणतीही कारवाई झालेली नाही.  जुन्या आणि झुकलेल्या विद्युत तारांची देखभाल वेळोवेळी न केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप जनतेनी केला आहे.पुढे शेतीचा हंगाम सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान  झाले असून या नुकसानाची भरपाई महावितरणने तातडीने द्यावी अशी  मागणी जनतेनी केली आहे.