चिमढा ग्रामपंचायत कुलुप बंद, जनतेला होत आहे त्रास!



रवि वाळके /दे दणका न्यूज 
  
  जनतेच्या सेवेसाठी असलेली ग्राम पंचायत चिमढा कामकाजाच्या दिवशी कुलुप बंद असल्याने जनतेनी रोष व्यक्त केला आहे. जनता विविध कामासाठी येत असते मात्र ग्रामसेवक यांच्यासह सरपंच,उपसरपंच तर सोडा शिपाई देखील नसल्याने जनतेच्या कामाविषयी किती जागृत आहेत हे यावरून दिसुन येते.कंत्राटदाराचे बिल काढायचे असेल तर झाडून पुसुन उपस्थित असणारे पदाधिकारी व कर्मचारी आज दिनांक २१ मे ला दुपारी १२ वाजता दरम्यान ग्राम पंचायत बंद कुलुप असल्याचे निदर्शनास आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त करीत गट विकास अधिकारी मूल यांनी लक्ष घालुन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
   पंचायत समिती मूल अंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायत चिमढा ही गडचिरोली महामार्गावर असल्याने कार्यालयीन वेळेत सुरू असणे आवश्यक आहे. मात्र ग्राम पंचायत प्रशासनाचा धाक शिपाई अथवा ग्राम सेविकेवर नसल्याने ग्राम पंचायतीचा कारभार रामभरोसे सुरू आहे. केव्हाही यायचे व केव्हाही जायचे असा गोरख धंदा या ग्राम पंचायतीमध्ये दिसत असून याकडे जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्यकार्यपालन अधिकारी यांनी देखील लक्ष देणे गरजेचे झाले आहे. विद्यार्थ्याचे प्रवेश प्रक्रिया असल्याने विविध दाखले लागत असतात. यासाठी विद्यार्थी ग्राम पंचायत मध्ये येरझारा घालताना दिसत असून ग्राम पंचायत प्रशासन मात्र गाढ झोपेचे सोंग घेतल्याचे दिसुन येते. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.


मंजुषा कुंभमवार ग्राम सेविका चिमढा :- 
   ग्राम पंचायत राजगड येथील प्रभार असल्याने आजचा दिवस राजगड येथे आहे. ग्राम पंचायत चिमढा येथे दोन शिपाई आहेत. त्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. याबाबत विचारणा करून माहिती घेतली जाईल.