उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाल्याने दीपक दुधे यांचा वर्ग मित्रांनी केला सत्कार !


  जुन्या आठवणीना मिळाला उजाळा 


रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
 
 मूल च्या मातीत जन्मलेला आमच्यातील वर्ग मित्र पोलिस उपनिरीक्षक झाल्याचे कळताच व्हॉट अप ग्रुपच्या माध्यमातून अभिनंदन करीत एकाच दिवसात त्याचे नियोजन करून हॉटेल शिवार मध्ये सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दीपक 
 दुधे वर्गमित्र हा पोलिस अंमलदार म्हणून रामनगर पोलिस स्टेशन चंद्रपूर येथे कार्यरत होता.2013 मध्ये त्याने विभागातंर्गत अर्हता  परिक्षा  दिलेली होती.   पोलिस महासंचालक यांच्या आदेशाने दीपक ला कोकण 2 महसूल विभागातंर्गत मुंबई शहर हे ठिकाण मिळाले आहे.त्यानिमित्त एक वर्गमित्र पोलिस उपनिरिक्षक झाल्या बददल वर्गमित्रांनी सत्काराचा कार्यक्रम घडवून आणला.रविवारी (ता.18  मे ) मूल येथिल  हॉटेल शिवार मध्ये दीपकचा शाल श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी पब्लीक पंचनामाचे संपादक विजय सिदधावार,पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अविनाश गरपल्लीवार, पोंभूर्णा पंचायत समितीचे सहायक प्रशासन अधिकारी  किरण वाढई, लोकमतचे तालुका प्रतिनिधी राजू गेडाम,हॉटेल शिवारचे संचालक बळवंत करकाडे,कर्मवीर महाविदयालयाचे  वरिष्ठ सहायक  किशोर वाकडे  आणि सकाळचे तालुका बातमीदार  तथा जनतेचा आवाजचे मुख्य संपादक विनायक रेकलवार आदी उपस्थित होते.
या सत्कार सोहळ्या निमित्याने महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आलेल्या गोड कडू आठवणीना उजाळा देण्यात आला. त्यावेळची मज्जा काही औरच होती असे उदगार सर्वांच्या तोंडून निघाले. असाच 
एक वर्ग मित्र मैत्रिणींचा कार्यक्रम दिवाळीत घेण्यात यावा त्या जेवणाचा सर्व खर्च मी देणार असे पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अविनाश गरपल्लीवार यांनी स्पष्ट केले. सर्वजण संपर्कात राहू या व दिवाळीपूर्वी एका कार्यक्रमात भेटू या अशी आशा व्यक्त करून सर्वांनी एकमेकांना जड अंतःकरणाने निरोप दिला.