ग्रामीण भागातील सुयोग तालुक्यातून प्रथम
घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची, वडील आजारी व आई स्वयंपाक करण्याचे काम अशा परिस्थितीत सुयोग गजानन वसाके या देवनिल विद्यालय टेकाडी येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्याने शालांत परीक्षेत ९५.६० टक्के गुण मिळवून ग्रामीण भागातून मूल प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. शाळेतील मुख्याध्यापक राजेश सावरकर व इतर शिक्षक वृंदानी वेळी वेळी मार्गदर्शन व आर्थिक बळ देत आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केल्याने आपण हे यश मिळवू शकलो असे तो अभिमानाने सांगतो. कुठलीही शिकवणी नसताना व घरच्या आर्थिक परिस्थितीवर मात करीत त्याने यश मिळविल्याचे सांगतो.भविष्यात विज्ञान विषय घेऊन होस्टेस मध्ये प्रवेश घ्यायचे आहे. व अतिशय मेहनत घेऊन डॉक्टर बनण्याचे सुयोगचे स्वप्न आहे. यावर त्याला विचारले असता डॉक्टर बनण्यासाठी खूप मेहनत व अर्थिक बळ लागते यावर विचारले असता आपले ध्येय डॉक्टर बनण्याचे आहे. कितीही संकट आले तरी त्यावर मात करण्याचा निर्धार केला असल्याचे लोकमत शी बोलताना व्यक्त केला. शाळेत विविध उपक्रमात सहभाग घेऊन आदर्श विद्यार्थी असलेल्या या सुयोगचे शाळेतील मुख्याध्यापक राजेश सावरकर, सर्व शिक्षक व गावातील होतकरू व्यक्तींनी घरी भेट घेऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
राजेश सावरकर मुख्याध्यापक देवनिल विद्यालय टेकडी:-
देवनिल विद्यालय टेकाडी येथील आदर्श विद्यार्थी म्हणून सुयोग वसाके असून अभ्यासाबरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारा , शैक्षणिक उपक्रमात सहभागी होणारा विद्यार्थी आहे.विविध विषयांवर भाषण स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा नियमित सहभाग दर्शवुन प्राविण्य प्राप्त केले आहे. नेतृत्व गुण, नम्रपणा, आदर्शव्रत जोपासणारा विद्यार्थी यासोबतच योगाभ्यासामध्ये विशेष आवड आहे. त्यामुळे भविष्यात त्यांनी ठरविलेल्या ध्येयात नक्कीच यशस्वी होईल अशी आशा आहे.
