रवि वाळके /दे दणका न्यूज मूल
विद्यासागर शिक्षण प्रसारक मंडळ मुल द्वारा संचालित देवनिल विद्यालय टेकाडी येथील विद्यार्थींनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२५ चा घवघवीत यश संपादित केले असून विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. सुयोग गजानन वसाके याने ९५.६०% घेऊन मुल तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला तर द्वितीय क्रमांक प्रथमेश मार्कंडी गोहणे ८३.६०%, तृतीय क्रमांक भुवन सुनिल कोटरंगे ७८.४०% ,चौथा क्रमांक प्रवज्जा मुकेश रामटेके ७५.८०% आणि पाचवा क्रमांक अनुष बंडु सोनुले ७४.४०% प्राप्त केले.एकुण विद्यार्थ्यांपैकी प्राविण्य प्राप्त ४, प्रथम श्रेणी १५, व्दितीय श्रेणी २२ आणि उतिर्ण श्रेणीत १० विद्यार्थ्यांनी यश संपादित केले.सर्व उत्तिर्ण विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष माजी आमदार देवरावजी भांडेकर, सचिव डॉ.महेश भांडेकर, मुख्याध्यापक राजेश सावरकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अंबादास राजनकर, नामदेव पिजदुरकर, संदीप धाबेकर, गणेश श्रीरामे, मनोहर मडावी, सुशिला उडाण, वैशाली भांडेकर, रविंद्र तुपकर, पुरुषोत्तम खोबे, आत्माराम सुरजागडे, विनोद मंगाम , सचिन कोल्हटवार यांनी अभिनंदन केले आहे .
