रेल्वे फाटकावर उड्डाणपूल करण्याची आमदार सुधीर मुनगंटीवार यांचेकडे मागणी




रवि वाळके/दे दणका न्यूज 
 

मूल मार्गावर कर्मवीर महाविद्यालयाजवळ रेल्वेचे फाटक आहे. बल्लारपुर, गोंदीया हा रेल्वे मार्ग असून रेल्वेच्या प्रवासी गाड्या डेपो, जलद प्रवासी गाड्या आणि माल वाहतुक करणाऱ्या आंतरराज्यातील गाड्या सतत धावत असतात.या रेल्वेमार्गावरील वाहतुक वाढलेली असून १५-२० मिनीटाला गाडी निघत असते. या मार्गावरची वाहतुक वाढलेली असून १५-२० मिनीटांत दोन्हीही बाजूलाशेकडो वाहने अडकून राहतात यात अति गंभीर आजार अवस्थेत असणाऱ्या रुग्णांच्या रुग्णवाहीका  उभ्या असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल निर्माण करण्याची मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचेकडे भाजपाचे मोती टहलियानी व इतर भाजपाच्या पदाधिकारी यांनी केली आहे.


मूल हे शहर व्यापारी वाहतुकीच्या दृष्टीने मध्यवर्ती स्थान असून चंद्रपूर गोंडपिपरी, चामोर्शी, आष्टी, गडचिरोली मुरुमगाव, रायपूर जबलपूर, गोंदिया, भंडारा, ब्रम्हपुरी, नागपूर चिमुर वर्धा अशा दुरवरच्या शहरांना जोडणाऱ्या मार्गाचे केद्रबिंदू आहे.
रेल्वे फाटकावर १५-२० मिनीट अडकून पडलेल्या गाड्यामुळे प्रवाशांना कमालीचा त्रास तर होतोच पण रुग्णवाहीकेत उपचारार्थ नेण्यात येणाऱ्या रुग्णाना वेळेअभावी जीव गमवावा लागु शकतो.या सर्व समस्या दुर हेण्यासाठी या रेल्वे फाटकावर उड्डानपुलाची निवांत गरज आहे.हे. हेरून  माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचेकडे निवेदन देत उड्डाण पुलाची मागणी करण्यात आली आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा नगर परिषदेचे माजी गटनेते मोतीलाल टहलियानी, जिल्हा परिषद चंद्रपूरच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरनुले, धनश्री नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष अजय गोगुलवार,नगर परिषद मूल चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, भाजपचे शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, भाजपाचे प्रवीण मोहूले, दादाजी येरणे, संजय मारकवार, राकेश ठाकरे आदी उपस्थित होते.