विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाकडे जाताना विचलीत होऊ नये - प्रा. मारोतराव पुल्लावार


    सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे पार पडला विद्यार्थ्याचा निरोप संभारभ !



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
  
आपले ध्येय निश्चित करण्यासाठी परिश्रम आवश्यक असून ध्येयाकडे जाताना विचलीत होऊ नये. तेव्हाच यश मिळत असते असे मौलिक विचार सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल चे शाळा सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रा. मारोतराव पुल्लावार यांनी निरोप कार्यक्रमात व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष नरसिंग गणवेनवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा सल्लागार समितीचे सदस्य मारोती कोकाटे, गणेश मांडवकर, डेव्हिड खोब्रागडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सुवर्णा पिपरे , पालक शिक्षक समितीच्या उपाध्यक्ष इंदू मडावी, शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप, पदवीधर शिक्षक राजू गेडाम, पालक प्रतिनिधी बोरकर आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरसिंग गणवेनवार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत परीक्षेत उत्तम गुणाने उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी अंशूल डुंमरे, समीर गेडाम, रोज गंगेलवार, समीक्षा शेंडे, आर्या कमलापूरकर, अभिषेक टिंगुसले, दिक्षा चौधरी, अपूर्वा थेरकर यांनी शाळेत घेतलेल्या अनुभवाचे कथन करुन जुन्या आठवणीना उजाळा दिला.भविष्यात चांगल्या पद्धतीने आपल्या ध्येयाकडे जाताना शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या मौलिक विचाराची शिदोरी आठवणीत ठेऊन वाटचाल करण्याचे आश्वासन यावेळी विद्यार्थ्यांनी दिले.कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षिका रीना मसराम, प्रस्ताविक पदवीधर शिक्षक राजू गेडाम मनोगत सहाय्यक शिक्षक बंडू अल्लीवर तर उपस्थितांचे आभार सहाय्यक शिक्षक योगेश पुल्लकवार यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक राहुल मुंगमोडे, अजय राऊत, संकेत जाधव आदींनी केले. अल्पोहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.