कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेली लाडकी बहिण मुख्यमंत्र्यांकडून न्यायाच्या प्रतिक्षेत !


मला माझ्या घराचा ताबा दयावा - पिडीत विवाहित महिलेचा आर्त  हाक 





रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

सासरच्या मंडळींनी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. मला माझ्या स्वतःच्या मालकीच्या घरातून बाहेर काढलेे.माझ्याच घरावर कब्जा केला. तालुका आणि जिल्हा पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटना यांना निवेदन दिले.ठोस न्याय मिळाला नाही.याबाबत प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहे.मात्र,न्याय मिळत नसल्याने मी असहय झाले आहे. मला माझ्या स्वमालकीच्या  घराचा ताबा मिळावा आणि कौटुंबिक हिंसाचार कायदयाप्रमाणे सासरच्या मंडळींविरूद्ध कारवाई व्हावी अशी मागणी शारदा जालिंदर गलगट यांनी केली आहे. स्थानिक पत्रकार भवनात सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, मी मूल येथील तहसिल कार्यालयात कंत्राटी लिपीक या पदावर कार्यरत आहे. माझे आठ वर्षा आधी प्रेम विवाह झाला.एक सात वर्षाचा बाळ आहे.वडिलाने मला मूल येथे दुर्गा मंदिराच्या परिसरात नझूलच्या जागेवर घर बांधून दिले.मी ,पती आणि मुलासोबत येथे राहत होती. काही कारणास्तव माहेरी गेली.परत आली असता पती,सासू आणि नंणद यांनी घरात घेण्यास मज्जाव केला.मारहाण करीत घरातून हाकलून लावले. मागिल दहा महिण्यांपासून मी माहेरी राहत आहे.शारीरिक,मानसिक आणि हुंडयासाठी सासरच्या मंडळीनी सतत त्रास दिला.याबाबत महिला तक्रार निवारण कक्ष,पोलिस ठाणे चंद्रपूर व मूल येथे  तक्रार दाखल केली. तसेच  आ.सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदन सादर केले. वडिलाने बांधून दिलेले घर माझ्या स्वतःच्या नावे आहे.त्यामुळे मूल येथील नगर परिषद यांनाही निवेदन सादर करून माझे मालकीचे घर मला मिळावे अशी मागणी केली.माझ्या स्वतःच्या घरावर सासरच्या मंडळीनी कब्जा केल्याने मला माहेरी जावून राहावे लागत आहे. माझा बाळ सुदधा माझ्या जवळ दिला नाही. प्रशासनाचे उबंरठे झिजवत आहे.न्यायाची प्रतिक्षा करीत आहे.कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेली एक महिला न्यायाची भिक मागत आहे.मात्र प्रशासन उडवाउडवीचे उत्तर देत आहे. मला  मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.माझ्या समस्याचे निराकरण करून मला न्याय दयावा आणि कौटुंबिक हिंसाचार कायदयाप्रमाणे माझा छळ करणा-या  सासरच्या मंडळीविरूदध पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी.  मला माझ्या स्वतःच्या घराचा ताबा मिळवून देण्यात दयावा .अशी मागणी शारदा जालिंदर गलगट यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रशासनाकडे  यावेळी केली. याबाबत त्यांनी आपले सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना नुकतेच निवेदन सादर केले आहे. लाडकी बहिणीने  मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा बाळगली आहे.पत्रकार परिषदेला वडील रमेश भगत,सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा मारगोनवार,नितिन खानोरकर उपस्थित होते.

यावेळी वडीलांनी सांगितले की,
मी ऑटोरिक्क्षा चालक आहे.मुलीचे लग्न थाटात लावता आले नाही.तोच पैसा घर बांधुन देण्यासाठी उपयोगी पडला.घर मुलीचे नावे करून देण्यात आले.सासरच्या मंडळीनी नाहक त्रास दिला. प्रशासनाने तिला तिच्या घराचा ताबा मिळवून दयावा.मुलीला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

श्रमिक एल्गारने पत्र पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांना पत्र देत
स्वताचे मालकीचे घरातून बाहेर काढून शारदा गलगट या महिलेचा छळ करणा-यांविरूदध कारवाई करावी.पिडीत महिलेने मूल पोलिस स्टेशनला लेखी तक्रार नोंदविली आहे. घरेलू हिंसाचार कायदयाप्रमाणे गंभीर गुन्हा असतानाही पोलिसांनी आरोपीविरूदध कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे तिच्यावर अन्याय होत आहे.शारदा गलगट हिला घरेलू हिंसाचार कायदयाप्रमाणे सरंक्षण व न्याय दयावा अशी मागणी श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्षा पारोमिता गोस्वामी यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक यांना एक पत्र दिले आहे.

मूल पोलिसांचे समजपत्र...
तक्रारीच्या आधारे मूल पोलिसांनी समजपत्र काढून 4मार्च 2025 रोजी समुपदेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एका तक्रारीच्या आधारे अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.