वाघाच्या हल्यात युवा शेतकरी ठार, उमा नदीच्या परिसरातील घटना




रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
 मूल तालुक्यातील चितेगाव येथे शनिवारी सकाळी एका
युवा शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. शेषराज पांडुरंग नागोशे (वय ३८) असे मृत शेतकऱ्याचे नाव असुन या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
शेषराज नागोशे हा युवा शेतकरी 
 आपल्या शेतातील भाजीपाला पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता .उमा नदीच्या परिसरात असलेल्या त्यांच्या शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात शेजराज याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वाघाच्या दहशतीमुळे नागरिक भयभीतःझाले असुन 
चितेगाव मरेगाव  परिसरात वाघाचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. ३ एप्रिल लाव याच वाघाने गावात घुसून एक गाय आणि एका गोह्याला ठार केले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी ही प्राणघातक घटना घडली. यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि गुराखी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नरभक्षक वाघाचा कायम स्वरुपी त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी जनतेनी केली आहे. 
या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल असून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे चितेगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.