आठवडी बाजार व मटण मच्छी मार्केट एकत्र केल्याने इतरत्र लावलेली सर्व दुकाने एका छताखाली यावेत जेणेकरून अपघाताची शक्यता राहणार नाही हा विचार करून राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी १३ लाख रुपये खर्च करून बाजार मार्केट तयार केले. भाजीपाला एकीकडे तर मटण, चिकन व मच्छी दुसरीकडे असे सुव्यवस्थित नियोजन केले असताना काही मच्छीमार व्यक्ती चंद्रपूर गडचिरोली महामार्गावरील वाल्मिकी गेट जवळ गेल्या आठ दिवसांपासून मच्छी विकण्यासाठी भर रस्त्यावर बसत आहेत.त्यामुळे लोकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. याच महामार्गावरून सतत वाहने जात असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. याकडे साहेब, लक्ष कोण देणार? असा प्रश्न शहर वासीयांनी उपस्थित केला आहे.
मूल शहरात आठवडी बाजार व मटण मार्केट इतरत्र भरत असल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत होते. त्यामुळे सर्व मार्केट एकत्रित भरावा अशी मागणी होऊ लागली.यासंदर्भात माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचेकडे मागणी करण्यात आली. या मागणीला प्रतिसाद देत १३ लाख रुपये खर्च करून अध्यायात बाजार मार्केट तयार करण्यात आले. त्याला रीतसर महात्मा ज्योतिबा फुले मार्केट यार्ड असे नामकरण करण्यात आले. भाजीपाला विक्री करणारे एकीकडे तर मटण, चिकन व मच्छी विक्री करणारे एका बाजूला अशी रचना तयार करण्यात आले.मार्केटच्या बाहेर भरणारे काही विक्रेत्यांना देखील नगर परिषद मूल चे मुख्याधिकारी संदीप दोडे यांनी विशेष मोहीम राबवित
सर्व वस्तूंची विक्री एकाच ठिकाणी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आला. त्याला सर्व विक्रेत्यांनी प्रतिसाद देत सर्व वस्तूंची विक्री एकाच ठिकाणी व्हायला लागली. हे सर्व सुव्यवस्थित असताना मच्छी विक्री करणारे काही व्यक्ती चंद्रपूर गडचिरोली महामार्गावर ज्यात वाहनाची सतत रेलचेल असते अशा वाल्मिकी गेट जवळ गेल्या अनेक दिवसांपासून मच्छीची विक्री केली जात आहे. त्यामुळे याठिकाणी गर्दी उसळलेली दिसुन येते.त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. त्यामुळे नगर प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
