सुभाष उच्च प्राथमिक शाळेचे अध्यक्ष नरसिंग गणवेनवार यांचा वाढ दिवस उत्साहात!




रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
  विद्या प्रसारण मंडळ मूल द्वारा संचालित सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल चे अध्यक्ष नरसिंग गणवेनवार यांचा वाढदिवस शाळेच्या विविध समित्यांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व शिक्षकाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. वाढ दिवसानिमित्य केक कापून सर्वांना भरविण्यात आला. वाढ दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक अविनाश जगताप यांनीयाप्रसंगी मनोगत व्यक्त करीत शाळेचे अध्यक्ष नरसिंग गणवेनवार यांच्या माणुसकीच्या परिचयावर प्रकाश टाकत उदार मतवादी धोरण असल्याने गरीब, अडचणीत असलेल्या व्यक्तींना ते नेहमी मदत करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी पंचायत समिती मूल चे माजी उपसभापती अमोल चुदरी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश नंदाराम, डेव्हिड खोब्रागडे, सुखदेव चौथाले, सुधीर भोयर,उषा शेंडे, लीना ताई बद्देलवार, सुवर्णा पिंपरे , इंदू मडावी, शाळेचे पदवीधर शिक्षक राजू गेडाम व सर्व समित्यांचे पदाधिकारी, सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सत्कार मूर्ती नरसिंग गणवेनवार यांना शाळेच्या वतीने भेट देण्यात आली. या सत्कार प्रसंगी आपल्या मनोगतात सर्वाचे आभार मानले आपल्या हातून गोर गरिबाचे कल्याण होईल हा हेतू ठेऊन आपण वाटचाल करीत असल्याचे सांगत माझ्या हातून सत्कार्य होण्याच्या दृष्टीने प्रयत्न राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक बंडू अल्लीवर तर उपस्थितांचे आभार योगेश पुल्लकवार यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे शिक्षक राहुल मुंगमोडे, अजय राऊत, रीना मसराम, संकेत जाधव,  निखिता पोहणे, संध्या आभारे,निशा जगताप, किर्ती मोकाशी, चित्रा फलके, मांजरा ठाकरे, संगीता रामटेके, नीता गावतुरे, माया बद्देलवार आदींनी परिश्रम घेतले.