तालुक्यातील दाबगाव मक्ता या गावापासुन काही अंतरावर असलेल्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूल अंतर्गत असलेल्या महामार्गावर खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत. या मार्गावरून बल्लारपूर राजुरा कडे मोठ्या प्रमाणात वाहने ये जा करतात.या मार्गावरून येताना दाबगाव मक्ता जवळील निखिल भुरसे यांच्या शेताजवळ खड्डे अनेक दिवसापासून पडले आहेत. येणाऱ्या वाहन धारकांना हे खड्डे दिसत नसल्याने अनेक दुचाकी वाहन धारकांचा अपघात होऊन गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.यासंदर्भात वेळोवेळी खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली मात्र संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने अपघाताची मालिका सुरूच आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी जनतेनी केली आहे.
दाबगाव मक्ता या गावावरून बल्लारपूर राजुरा कडे जाणारा मार्ग डांबरीकरण असुन सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूल च्या अधिपत्याखाली येत असतो. या मार्गावर दररोज शेकडो वाहने धावत असतात. रस्ता सुव्यवस्थित असला तरी दाबगाव मक्ता या गावाजवळील निखिल भुरसे यांच्या. शेताजवळील
रस्त्यावर खड्डे पडले आहेत. बल्लारपूर वरून येणाऱ्या वाहनधारकांना खड्डे दिसत नसल्याने नेमक्या त्याच खड्ड्यात दुचाकी वाहन धारकाचा अपघात होत आहे. मागील काही महिन्यापूर्वी 5 वर्षीय बालकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. तसेच दाबगाव मक्ता येथील वर्षा अविनाश बुरांडे ही महिला देखील गंभीर जखमी झाली होती. अशा अनेक अपघाताची शृंखला सुरू असून याकडे सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग लोकांच्या मृत्यूची वाट बघत आहे का? असा सवाल जनतेनी केला असुन त्वरित खड्डे बुजविण्यात यावे अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशारा जनतेनी दिला आहे.
