३४ हजार रुपयांचा लावला चूना!
मूल येथील श्रमिक नगर वार्ड न.८ मधील रहिवासी विशाल बट्टे यांच्या मालकीची मालवाहतूक ट्रॅक्टर आठ दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास तिघे जण मूल येथे इनोवा (क्रमांक एम.एच. ०३ ए. झेड. ९३८१) या वाहनाने आलेल्या व्यक्तींनी स्थानिक शाखेचे अधिकारी असल्याची बतावणी करत पकडला. व ट्रॅक्टर सोडवायचा असेल तर ५० हजार रुपयांची मागणी केली. पोलिस स्टेशनला गाडी लावण्याची धमकीही त्यांनी दिली. कारवाईच्या भीतीपोटी विशाल बट्टे यांनी २५ हजार रुपये ऑनलाइन दिले व उर्वरित पैसे नंतर देण्याच्या अटीवर ट्रॅक्टर सोडण्यात आला.
दुसऱ्या दिवशी पुन्हा ९ हजार रुपये ऑनलाइन दिले. मात्र, उर्वरित १६ हजार रुपयांच्या मागणीसाठी आरोपींनी विशालकडे तगादा लावला. या त्रासाने विशालला आरोपीवर शंका आल्यानेआली. त्यानंतर पोलिस नातेवाइकांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेमध्ये मनीष राऊत नावाचा अधिकारी आहे काय, याची माहिती घेतली. मात्र, या नावाचा कोणीही अधिकारी नसल्याची खात्री पटल्यानंतर गुरुवारी मूल पोलिस स्टेशनला त्याने तक्रार दाखल केली.
मालवाहू ट्रॅक्टर पकडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगत ट्रॅक्टर सोडविण्यासाठी मूल येथील एका व्यक्तीला ३४ हजार रुपयांचा चूना लावला. यासंदर्भात ट्रॅक्टर मालकाच्या लक्षात येताच पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन तासांच्या आत मूल पोलिसांनी चंद्रपूर येथील तिघांना शुक्रवारी पहाटे अटक केली. मनीष राऊत (४०) रा. बाबूपेठ, चंद्रपूर असे मुख्य आरोपीचे नाव असून, त्याच्यासोबत अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे.तक्रार दाखल होताच पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलिस निरीक्षक प्रमोद चौगुले यांनी तपासाची सूत्रे फिरवली आणि अवघ्या २ तासांच्या आत आरोपीला चंद्रपूर येथून अटक केली. या संदर्भात पुढील तपास मूल पोलिस करीत आहेत.
