मुरुमाचा परवाना संपला असतानाही भगवानपुर येथे ट्रकने मूरमाची वाहतुक !


 
तहसीलदार यांनी लक्ष देण्याची मागणी 





रवि वाळके/दे दणका न्यूज 
    
तालुक्यातील भगवानपूर येथे मूरमाची भरमार वाहतूक केली जात असुन  ८ ते १० हायवा ट्रक ने 
  प्रत्येक १० मिनिटाला एक हायवा दोन जेसीबी व एक पोकलँड च्या साह्याने  वाहतूक केली जात आहे.त्यामुळे शेकडो ब्रास मुरूम एका दिवसात 
उत्खनन  केले जात आहे .कंत्राटदाराने काढलेल्या ७०० ब्रास मुरूमचा खनिज परवानाचा मुरूम केव्हाच खोदून टाकण्यात आला आहे. पुन्हा हजारो ब्रास मुरूमाची वाहतूक केली आहे. दोन दिवसांपूर्वी दाबगाव मक्ता येथील बांधलेल्या संरक्षण भिंतीच्या खालील असलेल्या खड्ड्यात याच कंत्राटदाराने मुरुम टाकले आहे. यावरून परवाना संपला असताना देखील  मुरूमाची भरमार वाहतूक होत आहे.  याकडे  तहसीलदाराने लक्ष घालुन खोदलेल्या जागेची चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी जनतेनी केली आहे.
     चिरोली ते केळझर रस्त्याचे काम सुरू आहे. याच कामाबरोबरच इतरही कामासाठी ई. एल .आय. डी. सी. सी .कंपनीने ५०० ब्रास व शालिक दहिवले या कंत्राटदाराने  २०० ब्रास मुरुमाचा खनिज परवाना काढला आहे. मात्र दर १० मिनिटाला ८ ते १० हायवा ट्रक ने खोदून मुरूम टाकला जात आहे.७०० ब्रास मुरूम केव्हाच उत्खनन केले आहे. पुन्हा हजारो ब्रास मुरूम टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. दर १० मिनिटाला होत असलेल्या मुरुमाची वाहतूक केली जात आहे. याच कंत्राटदाराने दोन दिवसापूर्वी दाबगाव मक्ता येथील संरक्षण भिंतीच्या खालील असलेल्या खड्ड्यात मुरुम टाकण्यात आले आहे.
 एकीकडे जनतेला आरोग्याची समस्या तर दुसरीकडे  करोडो रुपयांच्या महसूलावर पाणी फेरल्या जात आहे. याबाबत चौकशी करून सबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी  जनतेनी  केली आहे.