बुध्द गया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ भव्य शांती मोर्चा


रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

भारतीय बौद्ध महासभा व समस्त बौद्ध समाज मूल तालुकाच्या वतीने बुध्द गया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ  भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळयाची जागा, मूल शांती मोर्चा निघुन तहसिल कार्यालयात विविध घोषणा देत नेण्यात आला. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना निवेदन तहसीलदार मृदुला मोरे यांच्या मार्फतीने देण्यात आले. सदर निवेदन योग्य माध्यमाने पाठविण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन सांगितले. यावेळी झालेल्या भाषणात बिहारमधील बुद्धगया महाबोधी महाविहार हे बौद्धांचे सांस्कृतिक आध्यात्मिक वारशाचे जागतिक आणि धार्मिक महत्वाचे वारसा आहे. महाबोधी महाविहार जिथे भगवान बुद्धांना ज्ञानप्राती झाली ते जगभरातील बौद्धांसाठी गहण आध्यात्मिक महत्व असलेले स्थळ आहे.त्यामुळे ते स्मारक होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.बौद्धांना त्यांच्या धार्मिक प्रथा व वारसा व्यवस्थापित करण्यासाठी व जतन करण्यासाठी सध्याची बोधगया मंदीर व्यवस्थापन समिती  रद्द करून ती संपुर्णपणे बौद्ध धर्मियांकडे ठेवण्यात यावी. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी बौद्ध महासभेचे वन माला रामटेके,अशोक रामटेके, रमेश मानकर, मधुकर रामटेके यांचेसह शेकडो बौद्ध बांधव उपस्थीत होते.