अपघाताची शक्यता बळावली!
जलसंपदा विभाग मूल अंतर्गत मूल तालुक्यातील दाबगाव मक्ता येथे असलेला नहर फुटल्याने पावसाचे पाणी सरळ रस्त्यावर येऊन रस्त्याची दुरावस्था होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूल च्या वतीने ७० लाख रुपये खर्च करून संरक्षण भिंत बांधण्यात आली. मात्र खोदलेल्या जागेवर मोठा खड्डा असल्याने मुरुमच्या माध्यमातून भुजविणे आवश्यक होते. मात्र कंत्राटदाराने फोडलेल्या डांबर रस्त्याचा मलमा त्या खड्यात टाकण्यात आले.त्यावरून मुरूम टाकून रोलरने पिचाई करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ये जा करणारे व्यक्ती, शाळेतील मुले त्यात पडुन अपघात होताना दिसत आहे. हे टाळण्यासाठी त्वरीत मुरूम टाकून संरक्षण भिंतीखालील खड्डा बुजविण्याची मागणी जनतेनी केली आहे.
मागील वर्षी फार मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने दाबगाव मक्ता येथील तलाव फुटून शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले होते. त्यातच याच गावाजवळ असलेल्या रस्त्यावर जलसंपदा विभाग मूल चे नहर फुटक्या अवस्थेत आहे. त्यामुळे त्यातील पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने दाब वाढून रस्ता मागील पावसाळ्यात फुटला होता. यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूल ने ७० लाख रुपयांचे अंदाज पत्रक तयार करून मंजूर करून घेतले. संरक्षण भिंतीचे काम करण्यात आले. मात्र हे काम करण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात मुरुम टाकून रस्त्यासमान बाजू करणे आवश्यक होते. मात्र त्या खड्यात
डांबर रस्त्यावरील मलमा टाकण्यात आला मात्र रोलरने दबाई करण्यात आली नाही. त्यामुळे तो खड्डा खळबळीत झाला आहे. या मार्गावरून हायवा, ट्रक, बस इतर वाहने ये जा करतात. रस्ता अरुंद असल्याने ये जा करणारे विद्यार्थी, गावातील महिला पुरुष त्या खड्यात पडून अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी त्वरीत मुरूम टाकून संरक्षण भिंतीचा परिसर सुव्यवस्थित करण्यात यावे अशी मागणी जनतेनी केली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूल चे सहाय्यक अभियंता देवाशीस मेश्राम यांचेशी संपर्क साधला असता काम लवकरच करण्यात येईल असे सांगितले होते. मात्र बरेच दिवस झाल्यानंतरही काम करण्यात आले नाही. त्यामुळे रोष व्यक्त करण्यात येत आहे.
