वैद्यकीय अधिकारी दुपारीच होतात गायब
रवि वाळके/दे दणका न्यूज मूल
करोडो रुपये खर्च करून ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. उद्देश हाच की जनतेला योग्य उपचार मिळवा. मात्र
चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने रुग्णांची गैरसोय होताना दिसत आहेत.त्या मुख्यालयी राहत नसल्याने नसुन दुपारीच गायब होत आहेत. त्यामुळे उपचार करण्यास अडचण होत आहे.
मूल तालुक्यातील चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत १८ गावे येत असुन विविध आजाराच्या उपचारासाठी जनता येत असते. या केंद्रावर एकच वैद्यकिय अधिकारी विशाखा नैतात कार्यरत आहेत. त्या देखील मुख्यालयी न राहता दुपारीच चंद्रपूरला निघुन जात असतात. त्यामुळे सायंकाळची ओपीडी औषधी निर्माताच सांभाळत असल्याची बाब समोर आली आहे. रात्री एखादी घटना घडली तर काय करायचे? असा प्रश्न जनतेनी केला आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात जनतेला आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असल्याने त्यांना लांब अंतरावर जाऊन उपचार करणे कठीण असते. यासाठी गावा जवळच उपचार करता यावा यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. मूल तालुक्यातील चिरोली अंतर्गत १८ गावे येत असुन यात चिरोली, जानाळा, फुलझरी, आगडी, कांतापेठ, टोलेवाही, केळझर, खालवसपेठ, सुशीदाबगाव , दाबगाव मक्ता, नलेश्वर, भगवानपूर, व इतर गावांचा समावेश आहे. या गावातून रुग्ण उपचार करण्यासाठी येत असतात. त्यांना योग्य उपचार होण्याच्या दृष्टीने वैद्यकिय यंत्रणा सज्ज असली पाहिजे माञ एकच वैद्यकिय अधिकारी असुन त्या मुख्यालयी राहत नाही. सकाळी येऊन त्या दुपारी चंद्रपूर ला पोबारा होतात. त्यामुळे दुपार नंतर कुणीच जबाबदार अधिकारी राहत नाही.औषधी निर्माताच तात्पुरत्या औषधी देऊन निपटवण्याचा प्रयत्न करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोग्य केंद्रात पुरेसे कर्मचारी नसल्याने रुग्णांची गैरसोय होताना दिसत आहे.याकडे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
