रवि वाळके/दे दणका न्यूज मूल
करोडो रुपये खर्च करून ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. उद्देश हाच की जनतेला योग्य उपचार मिळवा. मात्र
चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने रुग्णांची गैरसोय होताना दिसत आहेत.त्या मुख्यालयी राहत नसल्याने नसुन दुपारीच गायब होत आहेत. त्यामुळे उपचार करण्यास अडचण होत असल्याची बातमी दे दणका न्यूज पोर्टलला दिनांक १० मार्च ला प्रकाशित करण्यात आली.यासंदर्भात चिरोली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ .विशाखा आत्राम यांनी दे दणका न्यूजचे संपादक रवि वाळके यांना फोन करुन बातमी कशी दिली याबाबत सांगा अन्यथा घरी येऊन तमाशा करीन अशी धमकी दिली. या दिलेल्या धमकीचा निषेध करण्यात येत असून देशाचा चौथा स्तंभ असलेल्या स्वातंत्र्यावर पायबंद लावण्यात प्रकार असल्याचे सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाखा आत्राम यांनी माफी मागावी अन्यथा पुढील कारवाई करण्यात येईल असे रवि वाळके यांनी स्पष्ट केले आहे.
मूल तालुक्यातील चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत १८ गावे येत असुन विविध आजाराच्या उपचारासाठी जनता येत असते. या केंद्रावर एकच वैद्यकिय अधिकारी विशाखा नैतात कार्यरत आहेत. त्या देखील मुख्यालयी न राहता दुपारीच चंद्रपूरला निघुन जात असतात. त्यामुळे सायंकाळची ओपीडी औषधी निर्माताच सांभाळत असल्याची बाब समोर आली आहे. रात्री एखादी घटना घडली तर काय करायचे? असा प्रश्न जनतेनी केला आहे. या संदर्भात वृत्त प्रकाशित करताच दिलेली धमकी व्यक्ती स्वातंत्र्यावर पायबंद लावण्याचा प्रकार आहे. याबाबत सबंधित वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालुन वैद्यकीय अधिकारी डॉ विशाखा आत्राम यांना समज द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.