मूल येथे वार्ड न.१४ मध्ये किशोर ठेंगणे यांचे घरी आढळला मसन्या उद प्राणी!



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
येथील वार्ड नंबर १४ मधील रहिवासी ग्रामसेवक किशोर ठेंगणे यांच्या घराचे काम सुरू असताना अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा मसन्या उद प्राणी इंग्रजीत त्याला इशियन पाम सिव्हेट म्हणून ओळखले जाते. तो प्राणी  कामगारांना दि.२४ ला दुपारी २:३० वाजता दरम्यान  आढळला आहे. याबाबात ठेंगणे यांनी संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांना ही माहिती दिली.माहीती मिळताच संस्थेचे अध्यक्ष उमेश सिंह झीरे व इतर सदस्यांनी त्या ठिकाणी जाऊन इशियन पाम सिव्हेट या प्राण्याला सूरक्षीतपणे पकडले व वनविभागात नोंद करुन जंगलात सोडण्यात आले. हा प्राणी निशाचर असून याचे सामान्य आयुष्य १५ ते २५ वर्षाचे असते. हे प्राणी सहसा जंगलात झाडांच्या पोकळीत रहातात. दिवसेंदिवस यांचे अधिवास नष्ट होत असल्याने ते कधी गावातील पडक्या इमारतीत कींवा जंगला लगतच्या वस्तीत दिसून येतात.या प्राण्याचे खाद्य उंदीर, बेडुक, साप आणि सरडे आहेत.या प्राण्याला संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्या कडुन पहील्यांदाच मूल शहरात पकडण्यात आले आहे.