पोलिसांनी अवैध दारू पकडली, दे दणका न्यूज पोर्टरचाच दणका!



चिरोली परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या!



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
   
मूल तालुक्यातील चिरोली व परिसरातील गावात अवैध दारू विक्रीला उधाण आले असुन अनेक जण अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात उतरले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दारू विक्री करण्यासाठी अनेक दारू विक्री करणाऱ्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली असुन शरीराला घातक ठरणारी नकली दारू घरा घरात पोहचत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माञ पोलिस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने अवैध दारू विक्रेते जोमात तर पोलीस कोमात अशी स्थिती चिरोली परिसरात दिसून येत आहे. याकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची बातमी दे दणका न्यूज पोर्टल वर प्रसिद्ध होताच पोलिस अलर्ट होऊन दाबगाव मक्ता येथील यांच्या घरी काल दिनांक १० मार्च ला मूल पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी व त्यांच्या पथकाने 
   दाबगाव मक्ता येथील चरणदास भंडारी यांचे घरी धाड व
२८ देशी दारूचे बॉटल पकडुन कारवाई केलीआहे. त्यामुळे चिरोली परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
   तालुक्यातील चिरोली गाव राजकिदृष्ट्या संवेदनशील म्हणून गावाची ओळख आहे. मात्र राजकीय हेवे दावे होत असल्याने कार्यकर्त्याची शक्ती कुठे तरी कमी झाल्याचे दिसुन येते. यातूनच अवैध धंदे फोफावत आहेत. अवैध दारू विक्रीने डोके वर काढल्याने गावातील शांततेचे वातावरण भंगल्याचे दिसुन येत आहे. यातच जुगार देखील तेजीत असुन अनेकजण याकडे वळल्याचे दिसत आहेत. परवानाप्राप्त देशी दारू दुकान चिरोली येथे आहे.परिसरातील गावातील व्यक्ती चिरोली येऊन दारू प्राशन करण्यासाठी लांब अंतरावरून यावे लागते. तो त्रास सहन करण्याची गरज भासू नये व आपली दारू अवैध मार्गाने विकता यावी यासाठी अनेक जण याकडे वळले आहेत.पोलिसांचा आशीर्वाद असल्याने बिनदिक्कतपणे दारूची विक्री केली जात आहे. या दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होऊ लागले असुन अशा अवैध दारू विक्री विरोधात महिलांनी कंबर कसने आवश्यक झाले आहे. यावर आवार घालण्यासाठी चिरोली व परिसरातील महिलांना संघटीत होऊन आक्रोश करणे आवश्यक झाले आहे. अन्यथा पोलिसांचा हात अवैध दारू विक्रेत्यांवर राहून अनेकांच्या संसाराची वाताहत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा अवैध दारू विक्री करणाऱ्याच्या मुसक्या आवरणे आवश्यक झाले होते. या संदर्भात दे दणका न्यूज पोर्टलला बातमी प्रसिद्ध होताच मूल पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. यात गावच्या सरपंच निर्मला किरमे ,उपसरपंच योगिता गेडाम, सर्व सदस्य व गावातील महिलांनी पुढाकार घेतला.यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे .