स्त्री म्हणजे अडथळ्यावर मात, स्त्री म्हणजे क्षणाची साथ - प्राचार्य डॉ. अनिता वाळके




कर्मवीर महाविद्यालय मूल येथे मोठ्या उत्साहात पार पडला महिला दिन


रवि वाळके/दे दणका न्यूज मूल

शिक्षण प्रसारक मंडल मूल द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित कर्मवीर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय मूल येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.अनिता वाळके होत्या.यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सर्वांना माहिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व आपले मत व्यक्त करतांना म्हणाल्या ,आपल्या जीवनात स्त्रियांची भूमिका महत्वाची आहे. ती कधी आई,बहीण,पत्नी ,मुलगी किंवा मैत्रिण अशा भुमिका उत्तम पध्दतीने पार पाडत असते. प्रत्येक स्वरूपात कुटुंबाला, समाजाला, देशाला स्त्रीच्या सहकार्याची गरज असते. तिचे प्रत्येक क्षेत्रातील योगदान फार महत्त्वाचे आहे. .आज पुरुषांबरोबर स्त्रियादेखील सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत,परंतु आजदेखील स्त्री सुरक्षित नाही, हे खेदाने बोलावेच लागेन. लैंगिक शोषण,अत्याचार, हुंडाबळी, भृणहत्या या गोष्टीमुळे आजही स्त्रीयांमध्ये असुरक्षिततेची भावना आहेच त्यासाठी. स्त्री-पुरुष समानता ही आचरणात आणायला हवी असे सांगुन ,
"तुझ्या प्रयत्नांना मिळू दे, यशाचे सोनेरी किनार
लक्ष दिव्यांनी उजळू दे, तुझा संसार : कर्तृत्व आणि
सामर्थ्याची ओढून ये नवी झालर,
स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर !!"
या चारोळीतुन शुभेच्छा संदेश सुध्दा दिला.. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विचारपीठावर मा. ममता शेंडे एन. सी. डी. समुपदेशक आरोग्य विभाग उपजिल्हा रुग्णालय मुल यांनी मार्गदर्शनात खर्रा आणि तंबाखू खाल्ल्याने कर्करोग होतो असे सांगितले आणि व्यसनमुक्ती वर भाषण केले. यांना बारा वर्ष कर्करोगावर उत्कृष्ट कामगिरीबद्दल ट्राल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी प्रियंका गद्देकार कांतापेठ यांनी महिला बचत गटासाठी मोठ़े योगदाना दिले. या निमित्त याना ट्रॉल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांमधून सिद्धी अलोनी व योगेश सीडाम यांना उत्कृष्ट वाद-विवाद स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेच्या कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रा.डॉ.कापगते मॅडम यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. मान. वासंती अलोनी यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रा. सिंग मॅडम, प्रा.श्वेता दुर्गे मॅडम, प्रा. शेंडे मॅडम उपस्थित होत्या .सर्वांनी महिला दिन निमित्याने आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा.निरज चन्ने यांनी केले तर. कार्यक्रमाला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने करण्यात आली.