कृषी महाविद्यालय मूल च्या वतीने प्रयास- २०२५ वार्षिक स्नेहसंमेलन



विविध कार्यक्रमाने साजरा कार्यक्रम 


रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

कृषी महाविद्यालय मूलचे प्रयास- २०२५ वार्षिक स्नेहसंमेलन, दिनांक ६ ते ७ मार्च, २०२५ रोजी आयोजन करण्यात आले आहे. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता(कृषी) डॉ. श्यामसुंदर माने यांनी केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. माने यांनी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पहावी व त्या दिशेने सतत प्रयास करत राहावे, यश हे आपणास निश्चितच मिळणार, यश कमी अधिक प्रमानात मिळाले तरी अनुभव मिळणारच. प्रयास, प्रयत्नांचे रुपांतर यशामध्येच होते तरी विद्यार्थ्यांनी आपली उमेद न सोडता यशाकरिता सतत प्रयत्न करत राहावे असे सांगितले. याप्रसंगी महाविद्यालय आयोजित विविध कार्यक्रमाची व महाविद्यालयात वर्षभरात सुरु असेल शैक्षणिक व इतर कार्याची प्रशंसा याप्रसंगी केली. शिक्षनासोबतच विद्यार्थ्यामध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन हि एक संधी आहे याचा सर्वांनी उपयोग करुन घ्यावा असे विद्यार्थांना आवाहन केले. झाडीपट्टीतील विनोदी हिरा व नाट्य कलाकार हीरालालजी पेंटर यांनी आपण गरीब परीस्थीतीवर मात करून, वर्ग ९ वा नापास असून जीवनाच्या परीक्षेत यशस्वी झाले, आज नाट्य लेखक, नाट्य कलावंत, जादुगार म्हणून प्रसिद्ध आहे व महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ठ कलावंत पुरस्कार प्राप्त आहे असे सांगितले. विद्यार्थांनी आपल्या जीवनात नेहमी मेहनत करत राहावी, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये, सर्वधर्मसमभाव ठेवावा तसेच उच्च शिक्षण घेवून आपल्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे असे सांगितले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थांना मायेच पाखरू या नाट्यतील कविता तसेच इतर कविता व जादूचे प्रयोग सादर करून मान्यवरांचे व विद्यार्थांचे मनोरंजन केले. उद्घाटनाचे प्रास्ताविक कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकामधे त्यांनी शैशाणिक, संशोधन आणि विस्तार, किडा, रासेयो शिबीर, शैक्षणिक सहल इत्यादी राबवत असलेल्या उपक्रमाबाबत याप्रसंगी माहिती दिली. या दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विविध कार्यक्रमाचे जसे रांगोळी, मंडला आर्ट, पोस्टर, सांस्कृतिक कार्यक्रम, मूक नाट्य, संगीत आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. याप्रसंगी महाविद्यालया तील गुणवंत विद्यार्थी कु मंजुश्री कांबळे व ओम शिंदे तसेच रासेयो चा उत्कृष्ठ स्वयंसेवक म्ह्नणून अलुरी अरुण रेड्डी महाविद्यालयातील उत्कृष्ठ कामगिरी करणारे कर्मचारी सुनील धोटे व निलेश गावंडे यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. सदर उद्घाटन कार्यक्रमास कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापकवर्ग, कर्मचारी, सर्व विद्यार्थी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जानवी देवकर आणि समय उपरीकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. रमाकांत गजभिये यांनी मानले.