डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची विद्यार्थ्यांनी दिली समर्पक उत्तरे !
रवि वाळके/दे दणका न्यूज मूल
आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने स्पर्धेच्या युगात विद्यार्थी टिकला पाहिजे यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यात अभ्यासाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू म्हणुन शाळेतील सर्वच शिक्षक तळमळीने विद्यार्थ्यांना शिकवत असल्याने त्यांच्यात आवश्यक बदल घडवुन आणला जात आहे. विशेष म्हणजे विविध उपक्रमात पालकांचा सहभाग असल्याने शैक्षणिक प्रगतीसाठी सहकार्य मिळत असते. त्यामुळेच शाळेची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे मत विद्या प्रसारण मंडळ मूल द्वारा संचालित सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूलचे मुख्याध्यापक तथा संस्थेचे सचिव अविनाश जगताप यांनी डिजिटल मीडियाच्या पत्रकारांसोबत बोलतांना मत व्यक्त केले. यावेळी संख्येचे अध्यक्ष नरसिंग गणवेनवार , पदवीधर शिक्षक राजू गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नरसिंग गणवेनवार यांनी उन्हाळ्यात शाळेचे उर्वरीत पूर्ण काम पूर्ण करून शाळेला अद्यावत स्वरूपात नविन स्वरूपात शाळा निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे सन २०२५ - २६ या नवीन शैक्षणिक वर्षात अद्यावत डिजिटल शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे आश्वासन यावेळी पत्रकारांसमोर सांगितले.
विद्या प्रसारण मंडळ मूल द्वारा संचालित सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूलची स्थापना सन १९९१ ला झाली. इयत्ता १ ल्या वर्गात अवघ्या १४ विद्यार्थ्यांना प्रवेश देत सुरू केलेली ही शाळा आजच्या घडीला सेमी इंग्रजी माध्यमातून इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत एकूण ४४२ विद्यार्थी शिक्षण घेत असून विद्यार्थ्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येते. पुढील शैक्षणिक वर्षात नवीन स्वरूपात डिजिटल शाळा म्हणुन सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक अविनाश जगताप यांनी सांगितले. तत्पुर्वी सर्व डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनी इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांशी हितगुज केले. विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी समर्पक उत्तरे दिली. त्यामुळे पत्रकारांनी समाधान व्यक्त केले.
