नव्या प्रभारी ठाणेदार प्रमोद चौगुले साहेबांना सलाम



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

मूल शहरातील वाढत्या गुन्हेगारीकरणामुळे नागरिकांमध्ये चिंता आणि भितीचे वातावरण निर्माण करणारा ठरत होता. यापूर्वी असलेले ठाणेदार 
 परतेकी ठाण्याच्या बाहेर सहसा निघत नसल्याने त्यांचा वचक निर्माण झाला नाही. त्यामुळे मूल शहरात वाढलेली गुन्हेगारी प्रवृत्तीवर चिंता व्यक्त केली जात होती. या संदर्भात काही सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तीनी मादक पदार्थ विक्री संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या वाढणाऱ्या गुन्हेगारीवर वचक निर्माण व्हावे यासाठी नवे प्रभारी ठाणेदार तथा परिविक्षाधीन पोलिस उप अधिक्षक म्हणून प्रमोद चौगुले यांनी प्रभार घेताच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीमध्ये भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. जिथे गुन्हेगारी जन्म घेत आहे अशा ठिकाणी नवीन ठाणेदार साहेब भेट देत विचारपुस करण्यास सुरुवात केली आहे. आज साडे सात वाजता दरम्यान रेल्वे स्टेशनजवळील पॉवर स्टेशन, रेल्वे स्टेशन, कर्मवीर महाविद्यालय पटांगण, पाणठेले, नवभारत विद्यालय सोमनाथ रोड, चामोर्शी रोड परिसर पिंजून काढला. कर्मवीर महाविद्यालय पटांगणावर काहींना फटकारण्यात आले. आजच्या 
स्थितीत रात्री १० वाजता पाणठेले बंद केले जात आहे.
त्यामुळे मूल शहरात शांतता व सुव्यवस्था निर्माण होण्याचे संकेत या निमित्याने मिळू लागले आहे. यावरून नव्या ठाणेदारांनी घेतलेल्या पुढाकाराने त्यांना सलाम! असे मनावेसे वाटते.

         मूल शहर शांत व संयम राखणारे शहर म्हणुन ओळखले जायचे. मात्र गेल्या काही महिन्यापासून. हिंसक प्रवृत्ती वाढल्याचे दिसते. या 
 हिंसक घडामोडीमुळे तालुक्यात दहशतीचे चित्र तयार होत आहे. गुंडगिरी करणा-या युवकाचे टोळके पानठेल्यांवर बसून चिडीमारी करीत असल्याने त्यातून शहरातील वातावरण बिघडत चालले आहे. ठिकठिकाणी असणा-या शहरातील पानठेल्यांवर असे टोळके शिगारेटचे धुरके सोडताना अनेकाच्या निदर्शनास आहे. शालेय आणि महविदयालयीन मुलींना पाहून बाईक धुम स्टाईल पळविणे, अश्लील बोलणे, शाळा, महाविदयालय सुटण्याच्या वेळेस येरझारा मारणे अशा विविध कारणांमुळे गुंडगिरी वाढत चालली आहे. याकडे स्थानिक पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने गुंडगिरी करणा-या युवकांची हिंमत वाढत चालली आहे.  मूल शहरामध्ये विविध ठिकाणी चरस गांजा गुटखा यांचा अवैध वापर आणि विक्री होत असल्याचे बोलल्या जात होते . या संदर्भात निवेदनही देण्यात आले मात्र त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष झाल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालता आला नाही. त्यामुळे 
 मूल शहरात गुंडगिरी वाढत असुन गांजा पिण्यासाठी सिगारेटची मागणी वाढली असुन पान ठेल्यावर युवकाची गर्दी बघायला मिळत असल्याची चर्चा आहे. तीन महिन्यासाठी कालावधीसाठी आलेले परिविक्षाधीन पोलिस अधिक्षक 
  तथा मूल ठाण्याचे प्रभारी प्रमोद चौगुले यांनी घेतलेला पुढाकार मूल शहरासह तालुक्यात देखील शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्यास मोलाची कामगीरी बजाविण्यास सहाय्य ठरणार आहे. अशा नव्या उमेदीच्या नव्या ठाणेदार साहेबांना सलाम!