पोलीस ठाणे मुल ची कार्यवाही ११ जनावरांची सुटका
मूल पोलिस ठाण्यात
दिनांक १२ मार्च, २०२५ रोजी गोपनिय माहितीवरुन मूल हद्दीत मौजा नवेगांव भुज शेतशिवारात जनावरांची अवैध वाहतुक करण्याची तयारी करीत असलेल्याविरुध्द कार्यवाही करुन पोलीस ठाणे मुल येथे अपराध क्रमांक १०५/२०२५ कलम ५ (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६, सहकलम ११ (घ) (ड) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० व सहकलम ४, २५ भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे एकुण ४ आरोपी व एक विधीसंघर्ष बालक यांचेविरुध्द सदर गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.
सदर गुन्हयात एक एन्ट्रा वाहन क्र. MII34-BZ-0623 मध्ये ०५ जनावरे (गौवंश) आणि एक पिकअप क्र. MH29-BE-2304 मध्ये ०६ जनावरे (गौवंश) असे दोन्ही वाहनातुन एकुण ११ जनावरे (गौवंश) किं. २,०५,०००/- रु. व दोन्ही वाहने कि. ९,००,०००/- असा एकुण ११,०५,०००/- रुपयाचा मुद्देमाल तसेच आरोपीकडुन एक धारदार शस्त्र व त्याचा वापरता मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक, श्री दिनकर ठोसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुल, पो. ठाणे मुल येथील प्रभारी ठाणेदार श्री प्रमोद चौगुले परि. पोलीस उपअधिक्षक व पोनि श्री सुमित परतेकी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री अमितकुमार आत्राम, पोहवा प्रशांत गायकवाड, पोहवा सुनिल कुडमेथे, पोहवा भोजराज मुंडरे, पोअं. विशाल वाढई, चापोहवा प्रेम दासरवार पोलीस ठाणे मुल यांनी केली आहे.
