चिचपल्ली वनपरिक्षेत्रात सुरू आहे अंधाधुंद कारभार!
चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय अंतर्गत येणाऱ्या मूल वनपरिक्षेत्रात जबाबदारी पार पाडत नाही त्यामुळे असंतोष निर्माण झाल्याच्या तक्रारी असल्याने मूल चे क्षेत्र सहाय्यक एम. जे. मस्के यांना प्रतिनियुक्तीवर विरुर येथे पाठविण्यात आले. त्यांचे जागेवर महादवाडी येथील प्रशांत खनके यांचेकडे प्रभार सोपविण्यात आला आहे. मात्र ते देखील लक्ष घालत नसल्याने मूल परिक्षेत्र बेवारस झाल्याचे दिसुन येते. संदेदनशील असलेल्या मूल वाली कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मानव प्राणी संघर्ष या घटना नित्याचाच झाल्या आहेत. वनविभाग प्रयत्न करीत असताना देखील घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे कुणा एकाला दोष देण्यात काही अर्थ नाही. मात्र चिचपल्ली वनपरिक्षेतात अजब प्रकार सुरू आहेत. ज्या कर्मचाऱ्यांकडून अर्थकारण व्यवस्थीत होत नाहीत त्याला या ना कारण समोर करून मानसिक त्रास दिला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्व कर्मचाऱ्यांना जबाबदारी दिली असल्याने ते दिलेली जबाबदारी पार पाडतात. असे असताना क्षेत्र सहाय्यक एम. जे. मस्के हे मूल परिक्षेत्राची जबाबदारी सांभाळण्यास समर्थ नसल्याचा ठपका ठेवत एम. जे . मस्के यांची सेवा तात्काळ प्रभावाने विरुर परिक्षेत्र, मध्य चांदा वनविभाग, चंद्रपूर या रिक्त पदावर पुढील
आदेशापर्यंत मुख्य वनरक्षक चंद्रपूर यांनी
आदेशित केले आहे. त्या आदेशानुसार चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांनी प्रशांत खनके यांचेकडे मूल क्षेत्र सहाय्यक पदाचा कार्यभार सोपविला आहे. असे असले तरी प्रशांत खनके यांचे दर्शन अमावास्या पौर्णिमेला होत असल्याने वन्य प्राणी संघर्ष असेल किंवा वृक्ष तोड असेल याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याने दिसुन येत आहे.नियमित असलेल्या क्षेत्र सहाय्यक मस्के यांची विरुर येथे नियुक्ती केल्याने काय साध्य केले? अशी चर्चा सुरू झाली आहे. कुणाच्या तरी सांगण्यावरून एखाद्या कर्मचाऱ्यावर व त्यांच्या कुटुंबावर मानसिक दृष्ट्या आघात करण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. चिचपल्ली वनपरिक्षेत्रात दोन वर्षात लाखो रुपये खर्च करून वृक्षारोपण करण्यात आले. आजच्या घडीला वृक्षा ऐवजी गवत व वाळलेली झाडेच दिसत आहेत. लावलेल्या वृक्षाचे जतन करणे कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. मात्र त्याकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने जबाबदार कुणाला धरावे? असा प्रश्न जनतेनी वनविभागाला केला आहे
चिचपल्ली वनपरिक्षेतात अंधाधुंद कारभार सुरू असुन कर्मचाऱ्याचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याकडे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
