चिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नविन शौचालयायाची इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत !



रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
  
  तालुक्यातील चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात शौचालय असताना देखील चिरोली येथील ग्राम पंचायततीचे ग्रामसेवक व सरपंच शासनाकडून मिळालेल्या निधीची वाट लागण्यासाठी आरोग्य केंद्राच्या जवळ शौचालय बांधण्यासाठी ६ लाख रुपये खर्च करून शौचालय एक वर्षापूर्वी बांधण्यात आली. बांधकाम करून एक वर्ष लोटला तरी उद्घाटन करण्यात आले नाही. असे अनेक कामे गावात झाल्याची चर्चा आहे. मात्र 
वरीष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
  गावाचा विकास व्हावा यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांचा संवाद होणे आवश्यक असते. मात्र मूल तालुक्यातील चिरोली येथील ग्रामसेवकाचा मनमानी कारभार सुरू असुन मी म्हणेल तो कायदा अशी स्थिती चिरोली गावात दिसुन येत आहे.गावाच्या विकासासाठी करोडो रुपयाचा निधी या पाच वर्षात ग्राम पंचायतीला प्राप्त झाला. मात्र एकाधिकार शाहीने कारभार करून कंत्राटदार व स्वतःच्या मर्जीने काम करून कामाची वाट लावली असल्याची चर्चा गावात सुरु आहे.उपकेंद्रात शौचालय असताना जवळच शौचालय बांधुन त्या निधीची वाट लावण्याचा प्रकार समोर येत आहे.कंत्राटदार व आपण मिळुन खाऊ अशी स्थिती चिरोली ग्राम पंचायतीमध्ये दिसत आहे.शासनाच्या निधीची वाट लावणाऱ्या अशा ग्राम सेवकाची चौकशी करून इतरत्र हाकलून लावावे अशी जनमानसात चर्चा दिसत आहे.बांधलेल्या शौचालयाचे उद्घाटन केव्हा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.