रवि वाळके/दे दणका न्यूज
मागील काही वर्षांपासून महानगरपालिकांमध्ये प्रशासक राजवट लागू असून, संपूर्ण नियंत्रण राज्य शासनाकडे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधींची अनुपस्थितीमुळे प्रशासन बिघडले आहे आणि सर्वसामान्य जनतेला मूलभूत सुविधा मिळण्यात अडचणी येत आहेत. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दिनांक 4 मार्चला सकाळी 11 वाजेपासून काँग्रेस शहर कमिटीच्या वतीने कस्तुरबा चौक येथे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाला खासदार प्रतिभा धानोरकर, विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेस जिल्हा कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, त्यामध्ये काँग्रेसच्या विविध आघाडी संघटना – युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, एन.एस.यु.आय., इंटक तसेच सर्व विभाग व सेल सहभागी होणार आहेत.
चंद्रपूर शहरात मागील चार वर्षांत अनेक समस्या वाढल्या आहेत. महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना अपेक्षित सेवा मिळत नसल्यामुळे लोकांमध्ये संताप आहे. प्रशासक राजवटीच्या निष्क्रियतेला वाचा फोडण्यासाठी 4 मार्च रोजी दुपारी 11 वाजेपासून कस्तुरबा चौक येथे आंदोलन आयोजित करण्यात येत आहे. काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी सर्व कार्यकर्त्यांना आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.