जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग चंद्रपूरच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र चिरोली येथे गरजू अनुसूचित जाती, जमाती संवर्गातील लोकांना चष्माचे वाटप पंचायत समिती मूल चे गटविकास अधिकारी बी. एच.राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बावणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बबिता शाहू, डॉ. विशाखा आत्राम, जयंत कमाने आदी उपस्थित होते. चिरोली परिसरातील अनेक गरजू लोकांना चष्मे मिळाल्याने समाधान व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चिरोली येथील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
