मुख्याधिकारी संदीप दोडे यांचे संकेत
नगर परिषद मूल क्षेत्रातील वार्ड.क. १४ मधील बिएसएनएल रोड ते आदिवासी मूलांचे वस्तीगृह मार्गावरील सांगर प्रकाश वटटमवार वार्ड.क. १४ रा.मूल हे मालकीचे घरासमोरील कडूनिंब झाड उंची १५ ते २० फूट वय अंदाजे १० ते १५ वर्ष असलेले वृक्षतोड करीत असल्याचे तक्रार भ्रमनध्वनी संदेशावर प्राप्त होताच त्वरीत श्री. संदीप दोडे मूख्याधिकारी नगर परिषद मूल यांनी आपल्या कार्यालयीन पथकासह हजर झाले. त्यावेळी सागर प्रकाश वटटमवार यांनी मजूराद्वारे कडूनिंबाचे झाड तोडत असल्याने प्रत्यक्ष निदर्शनात येताच वृक्षतोड करण्याकरीता वापर करण्यात येणारे २ कू-हाड व एक शिडी जप्त केली.
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ मधील कलम २१(१) तरतूदींचे उल्लंघन केल्याने त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सूरु आहे.
सदर अधिनियमाचे उल्लंघन करुन जी कोणतीही व्यक्ती कोणतेही झाड तोडीलल किंवा कोणतेही झाड तोडण्यास कारणीभूत होईल किंवा वृक्ष अधिका-याने किंवा वृक्ष प्राधिकरणाने लादलेल्या शर्तीचे किंवा दिलेल्या आदेशांचे पालन करण्यात वाजवी सबबीशिवाय कसूर करील किंवा वृक्ष प्राधिकरणाच्या कोणत्याही सदस्यास किंवा वृक्ष अधिका-यास किंवा त्याला दूयम असलेल्या कोणत्याही अधिका-यास किंवा कर्मचा-यास या अधिनियमाखालील त्यांची कर्तव्ये पार पाडण्यात स्वच्छेने अडथळा आणील त्या व्यक्तीला अपराधसिध्दीनंतर, प्रत्येक अपराधाकरीता प्रती वृक्षास १,००,०००/- रुपये पर्यंत दंड मर्यादीत आहे. व इतक्या द्रवदंडाची आणि एक आठवडयापेक्षा कमी नसेल व एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची देखील शिक्षा होईल अशी तरतूद नमूद आहे. तरी नगर परिषद मूल क्षेत्रातील नागरीकांनी वृक्ष लागवड व वृक्षांचे संवर्धन करुन जास्तीत जास्त वृक्षांचे जोपासणा करावे. कोणत्याही व्यक्तीने वृक्षतोड करुन अधिनियमाचे उल्लंघन करु नये असे आवाहन श्री. संदीप दोडे मूख्याधिकारी नगर परिषद मूल यांनी केले आहे.
