मुख्यमंत्री सात कलमी कार्यक्रमानिमित्य १०० दिवसाच्या लोकोपयोगी प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे
आयोजन मूल तालुक्यातील मौजा - कोसंबी येथे तहसिल कार्यालय मूल च्या वतीने व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांच्या वतीने पि. एम. जनमन/ उन्नत ग्राम अभियान अंतर्गतविशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूलच्या तहसीलदार मृदुला मोरे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम पंचायत कोसंबीचे सरपंच रविंद्र कामडी, नायब तहसीलदार ओंकार ठाकरे, जागृत ग्राहक राजा संघटनेचे विदर्भ अध्यक्ष दिपक देशपांडे, सदस्य आनंदराव कुडे, गृह पाल प्रशांत फरकाडे, तहसिल कार्यालय मूल येथील पुरवठा निरीक्षक राजेश शिरभाते, मंडळ अधिकारी राजेन्द्र
नन्नावरे,तलाठी मंगेश गांडलेवार , बुध्दराज फुलझेले, महेश कडवलवार, प्रशांत वडस्कर , प्राची चौखे आदी उपस्थित होते.सदर विशेष शिबिरामध्ये तहसीलदार मृदुला मोरे यांच्या हस्ते पत्रू डोमाजी चौधरी , भागरताबाई पेंदाम, शांताबाई भोयर, भागरथाबाई गंगाराम उराडे ,गुरूदास गिरडकर, गौरव धनराज सिडाम, निकेश मारोती चौधरी , प्रेमिका रमेश मोहूर्ले , नूतन सियोग मोहुर्ले , लता अरूण शेंडे , राघोजी मन्साराम शेंडे , बजाबाई बापूजी जेंगठे,सुभाष आत्माराम गुरनुले,मनोज महादेव ठाकरे , अल्का मोहन किन्नाके ,प्रकाश बुधाजी चौधरी , ईश्वर बापूजी चौधरी आदींना प्रमाणपत्र व फॉर्मर आय. डी. चे वाटप करण्यात आले. शासनाचे अधिकारी गावात येऊन विविध प्रमाणपत्राचे वाटप केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
