शांतीधाम येथील श्मशाम भूमितील अतिक्रमण हटवा


मनपा आयुक्तांना निवेदन ; नागरिकांची मागणी


रवि वाळके/दे दणका न्यूज 

 चंद्रपूर शहरातील बिनबा गेट बाहेरील असणाऱ्या जुने शांतीधाम श्मशामभूमी परिसरातील लहान मुलांना दफण विधी साठी असणाऱ्या जागेवर अतिक्रमण झाले असल्याने ते अतिक्रमण हटवावे अशी मागणी सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी मनपा आयुक्तांना समाजसेवक राहुल देवतळे यांच्या पुढाकाराने एका निवेदनातून केली आहे. 

शहराला लागून असलेल्या बिनबा गेट परिसरातील जुने शांतीधाम परिसरात लहान मुलांच्या दफण विधीसाठी जी जागा होती त्यावर अतिक्रमण झाले असल्याने नागरिकांना लहान मुलांचा दफण विधी करायचा असल्यास कुठे करायचा ? हा प्रश्न पडत आहे. ही गंभीर समस्या असल्याने मनपा प्रशासनाने याकडे लक्ष वेधून त्या जागेवर असलेले अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी मनपा आयुक्तांना एका निवेदनातून समाजसेवक राहुल देवतळे यांनी केली आहे. यावेळी निवेदन देतांना वार्ड परिसरातील प्रविण कुलटे, राजु घटे, राजेश घटे, कार्तिक बोरेवार, दिनकर, दिपक घटे, सचिन बोबडे, बंडू वासेकर आदिसह उपस्थित होते.