पंचायत समिती मूल अंतर्गत जिल्हा परिषद उच्च श्रेणी प्राथमिक शाळा ताडाळा येथील शिक्षक धनराज प्रभुदास मून यांची मुलगी विधीशा
प्रभूदास मून हिची दुबई येथे आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे . विधीशा हीने नवभारत कनिष्ठ महाविद्यालय मूल येथे इयत्ता १२ वी मध्ये ८३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. पुढील शिक्षणासाठी पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अमरावती येथुन कॉप्युटर सायन्स इंजिनिअरिंग विभागात टॉपर असल्याने दुबई येथे आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी विधीशाची निवड करण्यात आली आहे. तिच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
